शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:51 IST

तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष : शासनाला पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.जिल्ह््यात मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस अद्याप पडलेला नाही. यामुळे शेतीची कामे अडली असून पेरणी वाळत आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असतानाही शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन पाठवून जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांतर्गत शुक्रवारी (दि.२६) माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, अशोक गुप्ता, जितेंश टेंभरे, केतन तुरकर, रजनी गौतम, अंचल गिरी, सुनील पटले, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, आशिष नागपुरे, प्रकाश देवाधारी, सुनिता दोनोडे, योगराज लिल्हारे, रवि पटले, शैलेंद्र वासनिक, पुनाप्रसाद लिल्हारे, नरेंद्र चिखलोंडे, रमेश गौतम, पुरनलाल उके, करण टेकाम, आरजू मेश्राम, आसीफ सय्यद, छन्नू येळे, धरमलाल रहांगडाले, तेजराम मडामे, हिरामन बावनकर, विकास गेडाम, दुर्याधन मेश्राम, प्रदीप रोकडे, नितीन टेंभरे, सतीश कोल्हे, मदन चिखलोंडे, शोभा गणवीर, विनायक खैरे, रमेश कुरील, नागो बंसोड, लखन बहेलिया, राजेश रहांगडाले, विजय ठाकूर, उमराव भगत, पंकज चौधरी, राजेश चौळे यांच्यासह कार्यकर्ता उपस्थित होते.एकरी २५ हजार रूपये भरपाई द्याराष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्या, सरसकट कर्जमाफी देऊन कृषी वीज बिल माफ करा, २४ तास वीज पुरवठा करा, धानाला तीन हजार रूपये हमी भाव द्या, शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध करवून द्या, रब्बी धानाला ७०० रूपये बोनस द्या, तालुक्याचे सर्वेक्षण करून त्वरी नुकसान भरपाई द्या, तालुक्यात रोजगार निर्मिती करून बेरोजगारी दूर करा, एमआरईजीएसचे प्रलंबीत देयक त्वरीत द्या, आरोग्य सेवेत सुधारणा करा, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून सर्व सामान्यांना सोय उपलब्ध करून द्या आदि मागण्यांना समावेश आहे.अन्यथा रस्त्यावरून तीव्र आंदोलन- जैनजिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना शासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे. अशात शेतकºयांना मदतीचा हात पुढे करून शेतकºयांच्या हितार्थ आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात याव्या. अन्यथा रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणार, असा इशारा निवेदन देताना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस