जिल्हा अधिवेशनात निर्णय : सहभागी होण्याचे आवाहन गोंदिया : महाराष्ट्र राज्य आंगणवाडी -बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजीत जिल्हा अधिवेशन रविवारी (दि.२१) पार पडले. या अधिवेशनात आंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शकुंतला फटींग होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाने, जिल्हा कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले, आयटकचे राज्य सचिव शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे, कल्पना शहारे, सुमित्रा रंगारी, जिवनकला वैद्य, विठा पवार, परेश दुर्गवार उपस्थित होते. याप्रसंगी २ सप्टेंबर रोजी आंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागणीसाठी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेत जास्तीत जास्त संख्येत संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संचालन आम्रकला डोंगरे यांनी केले. आभार गीता सूर्यवंशी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
२ सप्टेंंबरला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:15 IST