शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कोंडवाड्याअभावी जनावरे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:24 IST

शहरात वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येवर वाहतूक विभाग एक ना एक नवनवीन उपक्रम राबवून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असतानाच शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची समस्या वाढतच चालली आहे.

ठळक मुद्देवाहतुकीला जनावरांचा त्रास : नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येवर वाहतूक विभाग एक ना एक नवनवीन उपक्रम राबवून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असतानाच शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची समस्या वाढतच चालली आहे. मात्र नगर परिषदेकडे या मोकाट जनावरांना बंदीस्त करून ठेवण्यासाठी एकही कोंडवाडा नसल्याने जनावरे शहरात मोकाट फिरत आहेत. जनावरे रस्त्यांवरच ठाण मांडत असल्याने वाहतूकीला त्रास होत असून यातून अपघातही घडत आहेत. मात्र पालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे.शहरातील वाढती लोकसंख्या व त्याप्रमाणात वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. हे होत असताना मात्र रस्ते आहे तसेच आहेत. त्यात वाढ होत नसून उलट अतिक्रमणामुळे रस्ते अधिकच अरूंद होत चालले आहे. परिणामी आजघडीला शहरातून गाडी चालविणे कठीण व धोक्याचे झाले आहे. शहरातील या अव्यवस्थीत वाहतुकीला घेऊन वाहतूक विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तरिही वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक विभाग ट्राफीक सिग्नल, वन साईड पार्कींग सारखे उपक्रम राबवित आहे.मात्र शहरात मोकाट फिरत असलेल्या जनावरांपुढे वाहतूक विभागही नतमस्तक झाला आहे. बघावे त्या रस्त्यावर मोकाट जनावरांचे कळप दिसून येते. रस्त्याच्या मधोमध जनावरांचा डेरा राहत असल्याने त्यातून वाट काढणे कठीण होत आहे. मात्र यामागेही नगरपरिषदेची अकार्यक्षमता लपून बसली आहे.त्याचे कारण असे की, नगरपरिषदेकडे मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी आजघडीला एकही कोंडवाडा नाही. कोंडवाडा नसल्याने रस्त्यावर फिरत असलेल्या जनावरांना पकडून डोकेदुखी पाळण्याच्या नादात नगरपरिषद पडत नाही.नगरपरिषदेचा हलगर्जीपणा व अकार्यक्षमतेचा प्रभाव शहरातील वाहतुकीवर पडत असून शहरवासीयांसह वाहतूक विभागाचीही डोकेदुखी वाढवीत आहे. त्यामुळे पालीका प्रशासन केव्हा यावर योग्य पाऊल उचलते व कोंडवाड्याची व्यवस्था करून वाहतूक विभागाला सहकार्य करते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.कोडंवाडे तोडले, आवकही खुंटलीनगरपरिषदेकडे पूर्वी २ कोंडवाडे होते. एक नगरपरिषद कार्यालयाच्या मागे तर दुसरा गोविंदपूर शाळेत. मात्र नगरपरिषदेने हे दोन्ही कोंडवाडे तोडून टाकले. यातील नगरपरिषदेच्या मागील बाजूला असलेल्या कोंडवाड्याच्या जागेवर कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे. तर गोविंदपूर येथील शाळेत असलेल्या कोंडवाडा पाडून जागा मोकळी करण्यात आली. या कोंडवाड्यात पकडून ठेवलेल्या जनावरांच्या मोबदल्यात नगरपरिषदेला आवकही होत होती. मात्र कोंडवाडे तोडण्यात आल्याने नगरपरिषद या उत्पन्नापासून वंचीत आहे.जुन्या फायर आॅफिसचा कोंडवाड्यासाठी वापरकोंडवाडे तोडल्यानंतर नगरपरिषद कार्यालयाच्या शेजारी असलेल्या जुन्या फायर आॅफिसचा जनावरे कोंडण्यासाठी वापर केला जात होता. मात्र नगरपरिषदेने आता कित्येक महिन्यांपासून मोहीम राबविलीच नाही. परिणामी ही जागाही भयान पडून आहे. यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावरच बसून राहतात. त्याचा फटका मात्र शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी