शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

यंत्रातील आवाज पळवून लावणार जनावरांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

एकॉस्टिक डिवाईस नामक यंत्र बाजारपेठेत सहज उपलब्ध असून त्याची किमत सुध्दा फार नसल्याने त्याची खरेदी करणे शेतकऱ्याच्या आवाक्यात आहे. शेतात पाच फूट उंचीवर हे यंत्र लावणे शक्य आहे. यामुळे वन्यप्राणी आणि जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान टाळण्यास होणार मदत : शेतकऱ्यांची समस्या दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना नेहमी वन्यप्राणी आणि जनावरांकडून होणाºया पिकांच्या नासधुसीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष सुध्दा वाढत आहे. त्यामुळे होणारे नुकसान आणि संघर्ष टाळण्यासाठी एकॉस्टिक डिव्हाईस हे यंत्र उपलब्ध झाले आहे.या यंत्रातील आवाजामुळे जनावरांना पळावून लावणे शक्य होणार आहे.एकॉस्टिक डिवाईस नामक यंत्र बाजारपेठेत सहज उपलब्ध असून त्याची किमत सुध्दा फार नसल्याने त्याची खरेदी करणे शेतकऱ्याच्या आवाक्यात आहे. शेतात पाच फूट उंचीवर हे यंत्र लावणे शक्य आहे. यामुळे वन्यप्राणी आणि जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. हे यंत्र २०० मीटर अंतरापर्यंत काम करते. हे यंत्र पाच ते सहा फूट अंतरावर लावता येऊ शकते. तर दुसऱ्या यंत्राचे अंतर हे ११० मीटर असते. यामुळे जवळपास २५० अंतरापर्यंत हे यंत्र काम करते. या यंत्रासमोर कॅमेरा आणि जाळी सुध्दा लावता येते. यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती मिळण्यास मदत होते. जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कन्हारटोला, मोहघाट जवळील शेतांमध्ये या यंत्राचा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राणी आणि जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे.फॉक्स लाईटचा सुद्धा उपयोगएकॉस्टिक डिव्हाईस प्रमाणेच एक फॉक्स लाईट सुध्दा असून हे सुध्दा आवाज करणारे यंत्र म्हणून ओळखले जाते. शेतात प्रत्येकी ५० फूट अंतरावर ४ ट्रांसेक्ट लावून २०० फूट अंतरापर्यंत हे फॉक्स लाईट काम करतात. या यंत्रामुळे सुध्दा जनावरांपासून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते.काय आहे एकॉस्टिक डिव्हाईसएकॉस्टिक डिव्हाईस हे एक आवाज करणारे यंत्र आहे. या यंत्रातून विविध जनावरांचे आवाज निघतात. विशेष म्हणजे जनावरे जेव्हा शेताच्या परिसरात प्रवेश करतात तेव्हा या यंत्रातून आवाज निघतो. त्यामुळे जनावरे पळ काढतात. हे यंत्र सौर ऊर्जेवर चालत असल्याने विजेची सुध्दा गरज नाही. या यंत्राची किमत २५ हजार रुपये आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी