शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

अन् ‘तिला’ मिळाले नवजीवन

By admin | Updated: April 28, 2017 01:53 IST

हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असलेल्या शेतकरी पत्नीला पैशाअभावी उपचार करता आले नाही.

सत्य सामाजिक संस्थेचा पुढाकार : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचार गोंदिया : हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असलेल्या शेतकरी पत्नीला पैशाअभावी उपचार करता आले नाही. मात्र सत्य सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून सदर महिलेचा उपचार करवून ‘तिला’ नवजीवन मिळवून दिले. प्रीती गजानन शिवणकर रा. शिरपूर (ता. देवरी) असे त्या महिलेचे नाव असून आता ती गुण्यागोविंदाने आपल्या कुटुंबासह संसार करीत आहे. प्रीतीचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. चांगले सहजीवन सुरू असतानाच पहिल्या बाळाच्या प्रसूतीवेळेस तिच्या हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असल्याचे कळले. मुलगा लहान असताना काहीच करता आले नाही. मात्र नंतर उपचारासाठी नागपुरातील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये भटकंती झाली. सर्वच ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च सांगण्यात आला. पती शेतकरी असल्याने एवढा खर्च झेपावत नव्हता. अशातच सत्य सामाजिक संस्था आरोग्याविषयी काम करते व संस्थेची आपल्याला काही मदत होवू शकते, ही बाब लोकांच्या माध्यमातून पती गजानन यांना कळली. त्यांनी विलंब न करता संस्थेचे कार्यकारी संचालक देवेंद्र गणवीर यांना संपर्क साधला व आपली परिस्थिती सांगितली. गणवीर यांनी नागपूरच्या (कामठी) आशा हॉस्पिटलमध्ये डॉ. सौरभ अग्रवाल यांच्याशी संपर्क करून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक लांजे यांना प्रीतीला दाखविले. लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल अन्यथा दुसरा वॉलसुद्धा खराब होवू शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशाची अडचण होती. गणवीर मागील पाच वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची कल्पना होती. त्यांनी गजाजन यांंना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले व स्वत: नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. यानंतर नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात प्रीतीची फाईल जमा केली. आठ दिवसांनी फाईल पास झाली व एक लाख २५ हजार रूपये शस्त्रक्रियेसाठी मंजूर झाले. प्रीती १४ एप्रिलला आशा हॉस्पिटल नागपूर येथे भरती झाली व दुसऱ्या दिवसी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ती स्वगावी कुुटंबासह आनंदी असून तिने हॉस्पिटलचे संचालक डॉ. सौरभ अग्रवाल, सर्जन डॉ. विवेक लांजे, सत्य संस्थेचे देवेंद्र गणवीर, समन्वयक राहुल राऊत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.(प्रतिनिधी) १,२७० रूग्णांच्या शस्त्रक्रिया देवरी येथील सत्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजार २७० शस्त्रक्रिया करविण्यात आल्या. ज्या रूग्णांना हृदयाची अ‍ॅन्जीओप्लास्टी, बायपास, वॉल रिप्लेसमेंट, किडणी स्टोन, मूत्राशयाचे आजार, कॅन्सर, फ्रॅक्चर, पोटाचे विकार, ब्रेन ट्युमर, पॅरालिसिस व इतर मोठ्या आजारांचा उपचार बरेचसे रूग्ण पैशाअभावी करू शकत नाही. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रूग्णांना उपचारासाठी सदर संस्था नागपूर येथे त्यांना मदत करते. संस्थेचे मोफत शस्त्रक्रियेकरिता सल्ला व मार्गदर्शन केंद्र आहे. त्याद्वारे नागपूरमध्ये रूग्णांंना मोफत सेवा पुरविली जाते.