शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन् कलामांना आठवली गोंदियाची बिडी...

By admin | Updated: July 29, 2015 01:22 IST

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम म्हणजे अफाट ज्ञानाचा खजिनाच. पण आपल्या ज्ञानाचा, पदाचा कुठलाही लवलेश आपल्या वागण्यातून झळकू न देणारा....

साधेपणात दिसला ज्ञानपुरूष : शल्यविषारद जैन यांचा अनुभवगोंदिया : माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम म्हणजे अफाट ज्ञानाचा खजिनाच. पण आपल्या ज्ञानाचा, पदाचा कुठलाही लवलेश आपल्या वागण्यातून झळकू न देणारा त्यांच्यातील साधा माणूस अनुभवण्याचे भाग्य लाभले ते गोंदियातील सुप्रसिद्ध शल्यविषारद डॉ.राजेंद्र जैन यांना.९ वर्षांपूर्वी, अर्थात २००६ मध्ये डॉ.कलाम यांनी एका विशेष कामगिरीसाठी डॉ.जैन यांच्यासह त्यांच्या चमूतील सर्व १० लोकांना राष्ट्रपती भवनात पाचारण करून त्यांचा सत्कार केला. हा सत्कार म्हणजे केवळ राष्ट्रपतींनी चांगल्या कामगिरीसाठी कोण्या व्यक्तींचे केलेले ‘औपचारिक’ कौतुक नव्हते. हा आमच्यासाठी कलाम सरांचा एक ‘क्लास’च होता. या भेटीत त्यांनी विचारलेली माहिती आणि त्यातून भारतात प्रत्येक क्षेत्रात चांगले काय करता येईल यासाठी दिसलेली त्यांची तळमळ आम्हाला सर्वांनाच भारावून गेली, असे डॉ.जैन म्हणाले. याबाबत माहिती देताना डॉ.जैन यांनी सांगितले, पंतप्रधानांचे ओएसडी अखिल बक्क्षी यांच्या संस्थेकडून २००६ मध्ये गोंडवाना लॅन्ड एक्स्पिडिशन काढण्यात आली होती. त्यात २ भूगर्भशास्त्रज्ञ, १ वनस्पतीशास्त्रज्ञ, १ प्राणीशास्त्रज्ञ आणि डॉक्टर म्हणून माझी निवड झाली होती. भारत ते दक्षिण आफ्रिका या २५ हजार किलोमीटरच्या त्या प्रवासात १७ देशांना भेटी देऊन तेथील जीवनमानाचा आणि भौगोलिक गोष्टींचा अभ्यास आम्ही केला. ९६ दिवसांची ती मोहीम कारच्या प्रवासाने पूर्ण केल्यानंतर तत्कालीन मोहीमेतील सर्व १० सदस्यांना राष्ट्रपती डॉ.कलाम यांनी राष्ट्रपती भवनात पाचारण केले. यावेळी केवळ औपचारिक सत्कार न करता त्यांनी प्रत्येक सदस्याला त्याला आलेले अनुभव विचारले. काय पाहिले, त्यातून काय शिकले हे विचारले. मी गोंदियावरून आलो असे सांगितले त्यावेळी ‘गोंदिया.. बिडी’ असे मिष्किलपणे उद्गारून आपल्या ज्ञानाचा परिचय दिला, असे डॉ.जैन यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)