शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अन् हाती आलेले २८ हजार केले परत

By admin | Updated: March 11, 2017 00:18 IST

सगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून आता प्रामाणिकपणा जिवंत आहे की नाही, अशी शंका यायला लागते.

वाहतूक नियंत्रक शिपायाचा प्रामाणिकपणा खातिया : सगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून आता प्रामाणिकपणा जिवंत आहे की नाही, अशी शंका यायला लागते. मात्र सहजपणे हाती लागलेले २८ हजार रुपये संबंधित व्यक्तीला प्रमाणिकपणे परत करण्याचा चांगुलपणा दाखवून एका महिला पोलीस शिपायाने तमाम पोलीसवर्गाची मान उंचावली आहे. त्याचे असे झाले की, १० मार्च रोजी खातिया येथील रहिवासी हिमांशू बहेकार हे गोंदिया येथे एलआयसी कार्यालयामध्ये पैसे भरण्यासाठी जात होती. जयस्तंभ चौकातील आयसीआयसीआय बँकच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ते गेले असता एटीएममध्ये आपले २८ हजार रुपये असलेले पाकिट विसरुन गेले. त्यानंतर त्या एटीएममध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी मंगला बाबूलाल प्रधान (ब.नं.५८०) गेल्या असता त्यांना ते पाकिट मिळाले. त्यांनी तिथे उपस्थित लोकांना त्या पाकिटाबद्दल विचारले मात्र कोणीही ते आपले असल्याचे सांगितले नाही. दरम्यान पाकिटधारक हिमांशू बहेकार एलआयसी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना आपले पाकीट कुठेतरी हरवले याची जाणीव झाली. ते एटीएम मशीनजवळ आले मंगला प्रधान ते पाकिट कोणाचे आहे याचा सुगावा लागतो का म्हणून पाकिट उघडून पाहात होत्या. त्यांनी बहेकार यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड सर्व पाहून ते त्यांचेच असल्याची खात्री पटविली आणि त्यांना त्यातील पैशांसह परत केले. यावेळी कामठाचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुशील खरखाटे, होमगार्ड सुरसाऊत आदी उपस्थित होते.(वार्ताहर)