शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

समाजकारणावरही भर द्या

By admin | Updated: March 4, 2016 01:52 IST

मी राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त विश्वास ठेवते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंदिया व भंडारा...

पूर्णा पटेल यांचे आवाहन : पक्ष बळकटीकरणावर जोरगोंदिया : मी राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त विश्वास ठेवते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात राजकारणासोबत समाजकारणाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या पूर्णा पटेल यांनी केले.शहर राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पक्षाच्या इतर घटकांमधील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्णा पटेल मार्गदर्शन करीत होत्या. आ.राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पटेल यांच्या रामनगर बगिचा या बंगल्यात गुरूवारी बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी मार्गदर्शन करताना पूर्णा पटेल म्हणाल्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षासाठी काम केले पाहीजे. राजकारण महत्वाचे आहेच, पण त्यासोबत समाजाशी जुळून राहण्यासाठी समाजकारणही केले पाहीजे. या निमित्ताने सामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. आज युवा शक्ती ही समाजाची ताकद आहे. त्या शक्तीला नवी दिशा देऊन योग्य प्रवाहात जोडण्याची आवश्यकता आहे. खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात युवा वर्गाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी नवीन दिशा देण्याचे कार्य आपण करू, असे आवाहन त्यांनी केले.निवडणुकीच्या काळात जे युवा कार्यकर्ते आपल्यासोबत जुळले होते ते आजही आपल्या सोबत आहेत हे पाहून आनंद होतो. त्यांच्या माझ्यावर जो विश्वास होता तो कायम असल्याचे यातून दिसून येते. आपले नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनातच आपल्याला काम करायचे असल्याचे पूर्णा पटेल म्हणाल्या.आ.राजेंद्र जैन म्हणाले, विद्यमान सरकार केवळ घोषणा करीत असून शेतकरी आणि युवा वर्गासाठी काहीच करीत नसल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य भाव नसल्यामुळे हताश होऊन शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात पुढे येऊन सरकारवर दबाव बनविण्यासोबतच नागरिकांना जागरूक करण्याचे काम करावे, असे आवाहन आ.जैन यांनी केले.जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुका पर्यवेक्षक अशोक गुप्ता, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर आदींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे यांनी तर आभार शहर विद्यार्थी अध्यक्ष करण गील यांनी मानले. यावेळी गंगाधर परशुरामकर, अशोक सहारे, सुरज गुप्ता, निखील जैन, शहर युवक अध्यक्ष प्रतिक भालेराव, विनायक शर्मा, सुशिला भालेराव, सतीश देशमुख, रवी मुंदडा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)नवीन बुथ कमिटींचे गठन करायावेळी आ.राजेंद्र जैन यांनी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक शक्तीशाली बनविण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन बुथ कमिट्यांचे गठन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याचे सूचविले.सामाजिक कार्यासाठी इतर संस्थांचीही मदतपक्षाचे कोणतेही काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावानेच होईल. मात्र सामाजिक क्षेत्रातील अनेक कामे मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. देशात सामाजिक कार्य करणाऱ्या इतर संस्थांच्या माध्यमातूनही येणाऱ्या दिवसात गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक योजना कार्यान्वित केल्या जातील, असे पूर्णा पटेल म्हणाल्या.