शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीच्या सभेत सदस्याला बोलू न दिल्याचा आरोप

By अंकुश गुंडावार | Updated: August 14, 2024 18:52 IST

सदस्याने केला सभात्याग : पालकमंत्र्यांवर व्यक्त केली नाराजी

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीची सभा बुधवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना बोलण्यास मनाई केल्याने सभेचे वातावरण काही काळाकरिता तणावपूर्ण झाले होते. नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचा निषेध नोंदवित गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला.

विशेष म्हणजे नियोजन समितीच्या सभेला खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल, परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. सहेषराम कोरेटी, आ. मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सदस्याला प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखण्याची गोंदिया जिल्ह्यातील इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जाते. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी आपले काही प्रश्न उपस्थित करून प्रश्नाचे समाधान करण्याची विनंती केली. मात्र, पालकमंत्री आत्राम यांनी त्याचे समाधान करण्याऐवजी त्यांना बोलण्यास मनाई केली. त्यामुळे संतप्त माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी पालकमंत्रीच सदस्यांचे प्रश्न थांबवत असतील तर समस्यांचे समाधान कसे होणार, असे म्हणत सभात्याग करीत बाहेर निघाले.

नियोजन समिती सभेचा एक नियम असतो. प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक सदस्याला आहे, पण ते सभेच्या नियमानुसार असायला हवे. नियमाविरुद्ध असेल तर ते खपवून घेतले जात नाही. माजी आ. अग्रवाल यांची प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्यास मनाई केली. यानंतर ते या सभेतून निघून गेले.

- धर्मरावबाबा आत्राम, पालकमंत्री, गोंदिया

गोपालदास अग्रवाल यांंनी दिला सदस्य पदाचा राजीनामाजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१४) पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य गोपालदास अग्रवाल यांना सभेत बाेलू दिले नाही. याचा निषेध नोंदवित गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला. त्यानंतर नियोजन समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आठ महिन्यापुर्वी त्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली हे विशेष. नियाेजन समितीच्या सभेत सदस्याला बोलण्यापासून रोखणे हे लोकशाही विरोधी आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यापासून रोखणाऱ्या पध्दतीचा मी निषेध नोंदवित सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया