शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:29 IST

जेव्हा-जेव्हा शेतकरी बांधव संकटात सापडतो. त्या-त्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन सर्वतोपरी मदत करते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची जाणीव असल्याने त्यांच्या हितार्थ योजना दारापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सर्वत्रपणे राबविला जात आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : गटशेतीच्या शेतकरी राईस मिलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जेव्हा-जेव्हा शेतकरी बांधव संकटात सापडतो. त्या-त्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन सर्वतोपरी मदत करते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची जाणीव असल्याने त्यांच्या हितार्थ योजना दारापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सर्वत्रपणे राबविला जात आहे. शेतीमधून जास्तीत-जास्त उत्पादन घेण्यासाठी सामुहिक शेतीची कास धरण्याची आज गरज आहे. गटशेतीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या कंपनीला शासनाकडून भरभरुन अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्मविश्वास व प्रबळ इच्छेने शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून सामूहिक तत्वावर शेतकरी राईस मिल उभी राहील. हे प्रगतीचे द्योतक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.येथील बोंडगाव शेती विकास अ‍ॅग्री बिझनेस प्रोडूसर कंपनी लि. च्या वतीने चान्ना-बाक्टी येथे बनविण्यात आलेल्या शेतकरी राईस मिलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून चान्नाच्या सरपंच देवीका मरस्कोल्हे, तालुका भाजपा अध्यक्ष उमाकांत ढेंगे, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, माजी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष नामदेव कापगते, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.सदस्या कमल पाऊलझगडे, आत्मा विभागाचे सचिन कुमार, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, सहकारी बँकेचे संचालक केवळराम पुस्तोडे, सरपंच राधेशाम झोळे, पं.स.सदस्य पिंगला ब्राम्हणकर, रामलाल मुंगणकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम शेतकरी राईस मिलच्या कोनशिलाचे उद्घाटन करुन २९ लाख ३२ हजार ५६६ रुपये लागत लागलेल्या सुरी प्लांट शेतकरी राईस मिलचे नामदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते बटन दाबून शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना बडोले यांनी, शेतीपाूसन मनाजोगे उत्पादन घेण्यासाठी पाणी, वीज व वेळेचे नियोजन करणे अति आवश्यक आहे. पाण्याची दाहकता लक्षात घेता पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. परिसरातील शेती ही कोरडवाहू आहे. मागील महिन्यात कमी पाऊस पडल्याने उत्पादनावर निश्चित परिणाम झाला. एका पाण्यामुळे धानाचे पीक हातचे गेले त्या परिसराची पाहणी आपण स्वत: घेऊन संबंधीतांकडून किती प्रमाणात शेतकºयांना नुकसान झाला याचा आढावा घेणे सुरु आहे. चान्ना येथील लिफ्ट ईरीगेशनचा प्रस्ताव येत्या काही दिवसांत निवडणुकापूर्वी निश्चित मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तसेच तुडतुड्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व पैसा उपलब्ध असून बँक प्रणालीने विलंब होत असल्याचे त्यांनी सांगीतले. शेतकऱ्यांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजना राबवित आहे. प्रगती साधण्यासाठी शेतकऱ्यांनी गाव पातळीवर गट स्थापन करुन सामूहीक शेती करण्यासाठी पुढे यावे. गटमिळून तयार झालेल्या शेतकरी कंपनीला शासन मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करुन घेत आहे.यांत्रिकीकरणाने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह सर्व साहित्य अनुदानावर उपलब्ध करुन देत आहे. आज जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ८ कंपन्या उभ्या आहेत. मोठे उद्योग निर्माण झाल्याने शेतकºयांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असे बडोले म्हणाले.शेतकरी राईस मिलचे अध्यक्ष कुसन झोळे यांनी कंपनीच्या वाटचालीची यशोगाथा विशद केली. परिसरातील १५-२० गावातील ५५० शेतकऱ्यांचा सहभाग कंपनीमध्ये असून कंपनीच्या प्रगतीसाठी पालकमंत्र्यांनी गोडावून व सुरक्षा भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच धान खरेदी करण्याची परवानगी मिळवून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. याप्रसंगी कंपनीच्या सभासदांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले