शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजघडीला जगावर आलेले मोठे संकट ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत, विविध उपक्रमातून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजघडीला जगावर आलेले मोठे संकट आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन एकजुटीने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणा व पोलीस विभागासह अन्य यंत्रणांना सोबत घेऊन दिवस-रात्र काम करीत आहे. यातच जिल्ह्यातील ग्रामपंचायतही यासाठी सज्ज आहेत.गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जिल्हा परिषद काळजी घेत असून कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ५४५ ग्रामपंचायती सज्ज आहेत.जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये हँॅडवॉश स्टेशन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी हात कशाप्रकारे धुतले पाहिजे याची तांत्रिक माहिती देणारे बॅनर या सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आले आहे. सचित्र बॅनरवरून हात कशाप्रकारे धुवावे याची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे. तसेच कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारे बॅनर्स सुद्धा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवरील माहिती वाचून नागरिक दक्ष होत आहेत. सोबत इतरांना सुद्धा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत माहिती देत त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे.बाहेरून आलेल्या व्यक्तींचे अलगीकरणकोरोना विषाणूला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून ‘लॉकडाऊन’च्या काळात बाहेर राज्य व जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले गावातील व्यक्ती परत गावात आल्यास तसेच विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती गावातील नागरिकांनी सरपंच व तहसीलदारांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने आवश्यकता असल्यास त्यांचे घरीच अलगीकरण देखील करण्यात आले असून त्यांच्यावर ग्रामस्थांचे लक्ष आहे. ग्रामीण भागात कोरोनापासून बचावासाठी दक्षता घेतली जात आहे.ग्रामपंचायतकडून फवारणीजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्यात आल्यामुळे कोरोनासह अन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी नाल्यांची साफसफाई करवून घेतली आहे. त्यामुळे रोगराईस प्रतिबंध करण्यास हातभार लागत आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत