शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्राधिकरणातर्फे जमिनीचा ताबा घेण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:23 IST

तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोध : योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. यामुळे गुरूवारी (दि.२०) या ठिकाणी थोडा तणाव निर्माण झाला होता.बिरसी विमानतळ प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत कामठा-परसवाडा या मार्गाला लागून असलेली ४१ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. या वेळी बुलडोजर लावून जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान या वेळी काही शेतकऱ्यांनी याला विरोध केला. प्राधिकरणाकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसून या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतरच जमिनीचा ताबा घेण्यात यावा अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी आपल्याला अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसून बळजबरीने जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. विमानतळ प्राधिकरणाने नियमानुसार ही जमीन प्राधिकरणाच्या नावे झाली असून भूसंपादन अधिनियमानुसार जमिन ताब्यात घेतली जात असल्याचे सांगितले.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा. त्यानंतरच जमीन ताब्यात घेण्यात यावी.- मनोज दहीकर, शेतकरी व कृउबास संचालक...................................बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. मात्र काही शेतकरी या विरोधात न्यायालयात गेले आहे. पण सदर जमीन ही प्राधिकरणाच्या नावावर झाली असून भुसंपादन अधिनियमानुसारच ती आता ताब्यात घेतली जात आहे. यात कुठल्याची नियमाचे उल्लघंन करण्यात आले नाही.- सचिन खंगार, संचालक बिरसी विमानतळ.

टॅग्स :AirportविमानतळFarmerशेतकरी