शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:07 IST

जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, कमी पर्जन्याचा शेतीवर अनुकुल परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न कृषी विभागातर्फे केला जात आहे. यात तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.तालुक्यात पट्टा व श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. तालुक्यातील रेखा टेंभरे, दारकन बिसेन, ममता हटवार या महिला शेतकऱ्यांच्या बांधावर श्रमदान व रोवण्या करण्यात आल्या. जलयुक्त शिवार अभियान, उन्नत शेती समृद्ध शेतकरी यासारख्या अभियानाला जोड देत हायटेक शेती कशी करावी, याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन करीत आहे.लोकसहभागातून झाली कामेतिरोडा तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान सन २०१६-१७ मध्ये ग्रामपंचायत यंत्रने मार्फत मामा तलाव गाळ काढणे, नाल्यातील गाळाचा उपसा केल्याने पाणी साठ्यात वाढ करणे शक्य झाले. यामुळे भूजल पातळीत सु्द्धा वाढ झाली. निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या शेतात नेवून टाकला. त्यामुळे शेतीची सुपिकता वाढविण्यास मदत झाली.शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिन विकास शक्य आहे.-मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी, तिरोडा

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती