शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
7
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
8
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
9
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
10
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
11
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
12
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
13
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
14
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
15
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
16
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
17
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
18
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
19
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
20
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)

कृषी उपयोगी ट्रॅक्टर धावताहेत रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:19 IST

नवीन ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामधून सूट मिळते. मात्र बरेच व्यावसायीक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली.

ठळक मुद्देनियमांचे सर्रास उल्लंघन : कृषीकरिता उचल करून व्यावसायिक वापर, शासनालाही आर्थिक फटका

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवीन ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामधून सूट मिळते. मात्र बरेच व्यावसायीक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली. सद्यस्थितीत जिल्ह्यात कृषीच्या नावावर उचल केलेले तीन हजारांवर ट्रॅक्टर व्यावसायीक कामासाठी वापरले जात असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.शासन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांना सवलत दिली जात आहे. याचा शेतकºयांना लाभ होत आहे. मात्र इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकºयांच्या नावावर इतर लोक घेत आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ हजार ९४० ट्रॅक्टर असून यापैकी पाच हजार ट्रॅक्टरची व्यावसायीक कामासाठी उचल करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन हजार ९४० ट्रॅक्टरची कृषी कामासाठी उचल केल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली.नियमानुसार कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग हा कृषीसाठी करणे गरजेचे आहे. या ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतूद आहे. शिवाय सदर ट्रॅक्टरची नोंदणी सुद्धा रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र बºयाच लोकांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करुन त्याचा व्यावसायीक कामासाठी उपयोग होत आहे. यात कंत्राटदार, बिल्डर आणि रेतीमाफियांचा सर्वाधिक समावेश आहे.याप्रकारामुळे शासनाला कर स्वरुपात प्राप्त होणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हा प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही.कृषीच्या नावावर उचल केलेल्या ट्रॅक्टरचा शेती कामासाठीच वापर करणे आवश्यक आहे. त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर होत असल्यास दंडाची आकारणी व नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात लवकरच या विरुद्ध मोहीम राबवून कृषी उपयोगी ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग करणाºयांवर कारवाई केली जाईल.-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.असा उघडकीस आला प्रकारकृषीच्या नावावर उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग केला जात असल्याची बाब महसूल विभागाने रेतीची अवैध वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्टरवरुन उघडकीस आली. पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यात सदर ट्रॅक्टरची नोंदणी ही कृषी कामासाठी केली असून त्याचा व्यावसायीक कामासाठी वापर केला जात असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे नियमानुसार या ट्रॅक्टरवर १० पट दंड आकारण्यात आला.कारवाई होत नसल्याने मोकळे रानरस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे, ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय कळत नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत असून कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायीक कामासाठी उपयोग करीत आहे. शिवाय त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांना रान मोकळे असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेती