शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

कृषी पर्यटन दृष्टिपथास

By admin | Updated: July 1, 2014 01:31 IST

पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून

निधीचा अभाव : कारंजात १६ एकरात साकारणार पर्यटनाची योजनानरेश रहिले - गोंदियापूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून सहज विकास साधता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांपुढे कृषी पर्यटनाचा पर्याय ठेवला जात आहे. गोंदिया शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३५ एकर जागेपैकी १६ एकर जागेत कृषी पर्यटन प्रकल्प राबविण्याची संकल्पना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मांडली. एवढेच नाही तर ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.या कृषी पर्यटनासाठी १६ एकर जागेत बागायती फळ लागवड करुन ती पिके पाहण्यासाठी किंवा सकाळ संध्याकाळ या परिसरात इच्छुकांना भ्रमंती करण्यासाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल पंप हाऊस बसविण्यात आले आहे. त्या पंप हाऊसला तीन जलस्त्रोताने जोडण्यात आले आहे. दोन बोअरवेल व एक विहिरील पाणी या सेंट्रल पंप हाऊसमध्ये आणले जाईल. दीड लाख लिटर पाण्याचा साठा राहील. एवढे पंपहाऊस उभारण्यात आले आहे. खत व पाणी ड्रिपलाईनने फळबागांना देण्यात येणार आहे.या फार्ममध्ये फेरफटका मारण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या १६ एकरात डाळींबं, सीताफळ, पेरू, आंबा याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक गोष्टी स्वयंचलित यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. याशिवाय या फळबागांना सतत पाणी मिळावे यासाठी पावणे दोन कोटी लिटर क्षमतेचा तलाव पाणीसाठा करून ठेवण्यासाठी उभारण्यात आला आहे. या तलावात बाहेरचे मासे बोलावून छंद म्हणून पर्यटकांना मासेमारी करण्याची परवानगी कृषी विभाग देणार आहे. या तलावासाठी नियमित निधीतून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याच्या कृषी व्यवस्थापनाकरिता आलेल्या ४० लाखांच्या निधीपैकी काही निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला आहे. या कृषी पर्यटनात तीन किलोमिटरचा रस्ता तयार होणार असून गिट्टी व मुरूम टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. कृषी पर्यटनासाठी शासनाकडून दुसरे स्वतंत्र अनुदान नसले तरी कृषी विभागाला असलेल्या नियमित निधीतूनच कृषी पर्यटनाची संकल्पना साकारणार असल्याची माहिती अशोक कुरील यांनी दिली. याठिकाणी पिक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी जिल्ह्यातील कृषीसंबंधी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. याठिकाणी हवेतून व सौरऊर्जेतून एक किलो वॅट विजनिर्मिती करण्यात येणार आहे. ही वीज तेथील उपकरणे व कार्यालयातील कामासाठी वापरण्यात येणार आहे.