शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:07 IST

तालुक्यातील ग्राम चिखली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी पंधरवाडा व खरीप हंगामापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी : पंधरवडा व खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील ग्राम चिखली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी पंधरवाडा व खरीप हंगामापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच छाया रंगारी होत्या. यावेळी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, मंडळ कृषी अधिकारी मोहाडीकर, कृषी पर्यवेक्षक बावनकर, कृषी सहाय्यक आर.एम. वंजारी, कृषी मित्र कैलाश पटले प्रामुख्याने उपस्थित होते. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमात शेतकºयांना विविध विषयांचे धडे देऊन त्यांना अधिक उत्पन्न कमी खर्चात कसे घेता येईल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकºयांना माती परीक्षणाचे महत्त्व, योग्य बियाण्याची निवड कशी करावी, बिज प्रक्रिया पद्धतीने वापर, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्व, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, निंबोळी गोळा करणे, संकरीत भाताखालील क्षेत्राची वाढ करणे, पेर भारत क्षेत्र वाढविणे, हलक्या आणि जड धानाखालील क्षेत्र वाढ करणे, पट्टा पद्धतीचा अवलंब करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक वंजारी यांनी प्रास्ताविक मांडून बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. याप्रसंगी गावातील शेतकºयांनी मोठ्या संख्येत उपस्थित उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती