शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत अग्रवाल यांची भूमिका महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:02 IST

मध्य प्रदेशाचे नेहमीच गोंदियाशी पारिवारिक आणि राजकीय संबंध राहीले आहे. मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच प्रमाणात प्रभावित करीत असते. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बालाघाट जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून गोपालदास अग्रवाल यांची भूमिका प्रभावशाली राहिली असे गौरवद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काढले.

ठळक मुद्देकमलनाथ : विविध विषयांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्य प्रदेशाचे नेहमीच गोंदियाशी पारिवारिक आणि राजकीय संबंध राहीले आहे. मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच प्रमाणात प्रभावित करीत असते. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बालाघाट जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून गोपालदास अग्रवाल यांची भूमिका प्रभावशाली राहिली असे गौरवद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काढले.गोंदिया येथे मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमानिमित्त शनिवारी (दि.९) ते गोंदिया येथे आले होते. या वेळी त्यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते.या वेळी त्यांनी आ. अग्रवाल यांच्यासोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. कमलनाथ म्हणाले, अग्रवाल यांनी मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्ष संघटन बळकटीकरण आणि निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. शिवाय आपले त्यांच्याशी मागील २५ ते ३० वर्षांपासून पारिवारीक संबंध आहेत. गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचे काम आ. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात होणार असल्याचे सांगितले. या वेळी आ. अग्रवाल यांनी वैनगंगा नदीवर डांर्गोली सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली.या प्रकल्पासाठी महाराष्टÑ सरकार सुध्दा अनुकुल असून देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी कमलनाथ यांच्या हस्ते अग्रवाल यांच्या निवासस्थानी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. या वेळी मध्यप्रदेशचे खनिकर्म मंत्री प्रदीप (गुड्डा) जयस्वाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, महासचिव अपूर्व अग्रवाल, माजी खा.विश्वेवर भगत, अनुपसिंह बैस, आमदार मधू भगत, जुगल शर्मा, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, आलोक मोहंती, हरिश तुळसकर, पन्नालाल सहारे उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल