शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

एजंट अन् सीईओने ठेवीदारांचे ११.१५ लाख खिशात घातले! २०१२ ते १४ या वर्षातील घोळ

By नरेश रहिले | Updated: November 28, 2023 17:10 IST

सालेकसा आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नरेश रहिले, गोंदिया: सालेकसा येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेतील ठेवीदारांचे ११ लाख १४ हजार ८९५ रूपयाचा अपहार करणाऱ्या एजेंट व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांवर सालेकसा पोलिसात २७ नोव्हेंबर रोजी अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षातील घोळ असल्याचे लेखापरिक्षण अहवालात म्हटले आहे. उपलेखापरिक्षक विजय केवलराम मोटघरे (४४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सालेकसा येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था येथे नागरिकांच्या ठेवी होत्या. त्या संस्थेचा एजेंट जयकुमार लक्ष्मीप्रसाद श्रीवास्तव (५०) खोलगड ता. सालेकसा व पतसंस्थेतचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश रामप्रसाद खोब्रागडे (५४) रा. सालेकसा यांनी सन २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीत ११ लाख १४ हजार ८९५ रुपयाचा अपहार केला.

एजेंट संजयकुमार लक्ष्मीप्रसाद श्रीवास्तव यांना ६ मे २००६ पासून या संस्थेत अभिकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तेव्हापासून संजय श्रीवास्तव हा संस्थेचा अभिकर्ता म्हणून कार्यरत होता. त्याने संस्थेचे ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम संस्थेमध्ये कमी भरणा केली. तब्बल ७ लाख ८८ हजार ३२५ रूपयाची अफरातर केली. त्यानंतर संजय श्रीवास्तव याने संस्थेच्या पासबुकचा गैरवापर करून स्वतंकडे ठेवुन तसेच बनावट पासबुक तयार करुन ठेवीदारकडुन जमा केलेली रक्कम २ लाख २६ हजार ५७० रूॅपये असे एकुण १० लाख १४ हजार ८९५ रूपयाचा श्रीवास्तव याने अपहार केला आहे. संस्थेचे सचिव जगदिश रामप्रसाद खोब्रागडे यांनी १ लाख रूपयाचे खर्च व्हाउचर तयार केले. ते व्हाउचर विद्युत केंद्राचे प्रमाणपत्र, पावती संस्थेला सादर केली नाही. त्यांनी एक लाखाचा अपहार केला आहे. असे दोन्ही आरोपींनी संस्थेचे एकुण ११ लाख १४ हजार ८९५ रूपयाचा अपहार केल्याचे सविस्तर चाचणी लेखापरिक्षण अहवालात स्पष्ट झाले. आरोपींवर सालेकसा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी