शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हसण्या- बागडण्याच्या वयात कोरोनाने हिरावले वडिलांचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

नरेंद्र कावळे आमगाव : मागील दीड वर्ष प्रत्येक जण आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीचा सामना करीत आहे. कोरोनाच्‍या या हाहाकारात अनेक बालके ...

नरेंद्र कावळे

आमगाव : मागील दीड वर्ष प्रत्येक जण आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीचा सामना करीत आहे. कोरोनाच्‍या या हाहाकारात अनेक बालके अनाथ झाली. अशा बालकांच्‍या जीवनात कोरोनामुळे अंधार निर्माण झाला. अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातही काही कुटुंबांवर कोरोनामुळे दुःखाचे डोंगर कोसळला आहे. त्यात वडिलांचे छत्र हरविलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीला मदतीचा हात हवा आहे.

जेमतेम ३५ वर्षे वय असलेल्या संतोष राऊत यांचे एप्रिल महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. संतोष यांची परिस्थिती हलाखीची होती. चौथ्या वर्गात शिकत असताना व खेळण्याचे वय असताना वडिलांचे छत्र हरविल्याने आजोबांनी (आईचे वडील) संतोष यांचे संगोपन केले. आजोबांसोबत छोट्याशा झोपडीत ते राहायचे व मोलमजुरी करून आजोबांनी त्यांना शिक्षण दिले. पदवीचे शिक्षण घेत असताना आजोबा वारले. शिक्षणासोबत घड्याळ दुरुस्तीचे काम करून संतोष आपला उदरनिर्वाह करीत होते. घड्याळ दुरुस्तीच्या कामातून मिळालेल्या पैशांतून छोटेसे घर बांधून कुणाचा आधार नसल्याने स्वतःची मेहनत व कष्टावर त्यांनी लग्न केले. कुटुंबाचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी ही जबाबदारी सर्मथपणे पेलली होती. त्यांच्या संसारात एका लहान परीचे आगमन झाले. मुलीला चांगले शिक्षण द्यायचे, तिचे उज्ज्वल भविष्य घडवायचे, हे स्वप्न उराशी बाळगून संतोष सर्व अडचणी व संकटांवर मात करीत होते; परंतु नियतीला हे मान्य नव्हते. संतोष यांचे कोरोनामुळे एप्रिल महिन्यात निधन झाले. नऊ वर्षांच्या प्राचीला काही कळेना. आई पण कर्णबधिर आणि वडिलांच्या संपर्कात आल्यामुळे आईला पण कोरोना झाला. त्यामुळे तिला शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आले. प्राचीने वडिलांना बघितलेसुद्धा नाही. आता काही दिवस आईपासून दूर चिमुरडी शेजारच्या घरी असतानाच वडील गेल्यापासून अवघ्या १०-१२ दिवसांत तिच्या पोटात दुखायला लागले आणि शेजाऱ्यांनी डॉक्टरला दाखविले, तर तिला अपेंडिक्स झाल्याचे कळले. प्राचीच्या आजोबांनी गोंदिया येथे नेऊन तिची शस्त्रक्रिया करविली. प्राची आता बरी होऊन घरी आली. तिच्या आईने कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे.

-------------------------

शिक्षण व आरोग्यासाठी हवी मदतीची गरज

घरी राहून पोटाची खळगी भरणार नाही, म्हणून उदरनिर्वाहासाठी प्राचीची आई रोवणीच्या कामाला जात आहे. प्राची शेजारच्या मदतीने घरी एकटीच असते. सायंकाळी आई येण्यापूर्वी घर झाडून काढणे, भांडी घासणे करून आईची वाट पाहत असते. ती सध्या चौथ्या वर्गात असून, तिला शिकण्याची खूप आवड आहे. शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. प्राचीचा उत्साह वाढविण्याची गरज असून, पुढील शिक्षण व आरोग्यासाठी मदतीची गरज आहे.