शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हसण्या- बागडण्याच्या वयात कोरोनाने हिरावले वडिलांचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

आता काही दिवस आईपासून दूर चिमुरडी शेजारच्या घरी असतानाच वडील गेल्यापासून अवघ्या १०-१२ दिवसांत तिच्या पोटात दुखायला लागले आणि शेजाऱ्यांनी डॉक्टरला दाखविले, तर तिला अपेंडिक्स झाल्याचे कळले. प्राचीच्या आजोबांनी गोंदिया येथे नेऊन तिची शस्त्रक्रिया करविली. प्राची आता बरी होऊन घरी आली. तिच्या आईने कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे.

ठळक मुद्देआई करीत आहे रोवणीची कामे : पैशांअभावी शिक्षणही कठीण : प्राचीला हवा आहे मदतीचा हात

नरेंद्र कावळेलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव :  मागील दीड वर्ष प्रत्येक जण आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीचा सामना करीत आहे. कोरोनाच्‍या या हाहाकारात अनेक बालके अनाथ झाली. अशा बालकांच्‍या जीवनात कोरोनामुळे अंधार निर्माण झाला. अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातही काही कुटुंबांवर कोरोनामुळे दुःखाचे डोंगर कोसळला आहे. त्यात वडिलांचे छत्र हरविलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीला मदतीचा हात हवा आहे.जेमतेम ३५ वर्षे वय असलेल्या संतोष राऊत  यांचे  एप्रिल महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. संतोष यांची परिस्थिती हलाखीची होती. चौथ्या वर्गात शिकत असताना व  खेळण्याचे वय असताना वडिलांचे छत्र हरविल्याने आजोबांनी (आईचे वडील) संतोष यांचे संगोपन केले.  आजोबांसोबत छोट्याशा झोपडीत ते राहायचे व मोलमजुरी करून आजोबांनी त्यांना शिक्षण दिले. पदवीचे शिक्षण घेत असताना आजोबा वारले. शिक्षणासोबत घड्याळ दुरुस्तीचे काम करून संतोष आपला उदरनिर्वाह करीत होते. घड्याळ दुरुस्तीच्या कामातून मिळालेल्या पैशांतून छोटेसे घर बांधून कुणाचा आधार नसल्याने स्वतःची मेहनत व कष्टावर त्यांनी लग्न केले. कुटुंबाचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी ही जबाबदारी सर्मथपणे पेलली होती. त्यांच्या  संसारात एका लहान परीचे आगमन झाले. मुलीला चांगले शिक्षण द्यायचे, तिचे उज्ज्वल भविष्य घडवायचे, हे स्वप्न उराशी बाळगून संतोष सर्व अडचणी व संकटांवर मात करीत होते; परंतु नियतीला हे मान्य नव्हते. संतोष यांचे कोरोनामुळे एप्रिल महिन्यात निधन झाले. नऊ वर्षांच्या प्राचीला काही कळेना. आई पण कर्णबधिर आणि वडिलांच्या संपर्कात आल्यामुळे आईला पण कोरोना झाला. त्यामुळे तिला शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आले. प्राचीने वडिलांना बघितलेसुद्धा नाही. आता काही दिवस आईपासून दूर चिमुरडी शेजारच्या घरी असतानाच वडील गेल्यापासून अवघ्या १०-१२ दिवसांत तिच्या पोटात दुखायला लागले आणि शेजाऱ्यांनी डॉक्टरला दाखविले, तर तिला अपेंडिक्स झाल्याचे कळले. प्राचीच्या आजोबांनी गोंदिया येथे नेऊन तिची शस्त्रक्रिया करविली. प्राची आता बरी होऊन घरी आली. तिच्या आईने कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे. 

शिक्षण व आरोग्यासाठी हवी मदतीची गरज 

- घरी राहून पोटाची खळगी भरणार नाही, म्हणून  उदरनिर्वाहासाठी प्राचीची आई रोवणीच्या कामाला जात आहे. प्राची शेजारच्या मदतीने घरी एकटीच असते. सायंकाळी आई येण्यापूर्वी घर झाडून काढणे, भांडी घासणे करून आईची वाट पाहत असते. ती सध्या चौथ्या वर्गात असून, तिला शिकण्याची खूप आवड आहे. शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही.  प्राचीचा उत्साह वाढविण्याची गरज असून, पुढील शिक्षण व आरोग्यासाठी मदतीची गरज आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या