शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मोरवाहीवासीयांनी आंदोलन घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलन दरम्यान दोषींवर दान दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने २ महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार बांधकामप्रकरणी मागील ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोरवाहीवासीयांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची  दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींवर कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर सोमवारी (दि.१) रात्री उशिरा आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समितीतर्फे करण्यात आली. समितीने आंदोलन मागे  घेतल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे.मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलन दरम्यान दोषींवर दान दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने २ महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. अखेर मोरवाही येथील बौद्ध समाजबांधव तसेच आमगाव येथील बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर गुरुवारपासून (दि.२८) अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला बळ म्हणून येथील महिलांनी सोमवारी (दि.१) ) आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी महिलांच्या हातून ज्वलनशील पदार्थ हिसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे काहीकाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते.  तसेच लेखी आश्वासनानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनासाठी डी. एस. मेश्राम, संदीप मेश्राम, श्रेयस गोंडाने, मंगल गोंडाने, आनंद बन्सोड, उमाकांत भालेकर, पंचशीला मेश्राम, संगीता रामटेके, प्रमिला मेश्राम, शालिनी मेश्राम, सूर्यकांता वैद्य, सविता मेश्राम, सुनीता वैद्य, माधुरी मेश्राम, पंचशीला भालाधरे,   पोर्णिमा मेश्राम, तारा भीमटे, प्रतिमा सोनटक्के, कल्पना मेश्राम, पद्मा टेंभुर्णीकर, शालिनी आनंद मेश्राम आदीनी सहकार्य केले.

आठ दिवसात करणार कारवाई - चर्चेत जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, पोलीस निरीक्षक बोरसे, आंदोलकांतर्फे भारतीय बौद्ध महासभा आमगावचे अध्यक्ष भरत वाघमारे, सचिव योगेश रामटेके, समता बुद्ध विहार समितीचे दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, आशिष मेश्राम, अनिल रामटेके, चंद्रशेखर मेश्राम, राजकपूर मेश्राम, पूर्व सरपंच सुरेश कावळे, पोलीस पाटील विनोद ठाकूर सहभागी झाले होते. यात आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करीत या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी