शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यानंतर होणार न.प. स्थायी समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:55 IST

नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. तब्बल ७ महिन्यांनंतर तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेला घेऊन नगर परिषदेत विविध चर्चेला उत आले आहे.

ठळक मुद्देतीन विषयांवर भर : नगरसेवकांसह, शहरवासीयांचे लक्ष

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. तब्बल ७ महिन्यांनंतर तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेला घेऊन नगर परिषदेत विविध चर्चेला उत आले आहे.महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेण्यात यावी असा नियम असून तो नगर परिषदेला बंधनकारक आहे. त्यानुसार महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा व दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेतली जाते.गोंदिया नगर परिषदेचा कारभार मात्र अन्य नगर परिषदांपेक्षा वेगळा आहे. येथे स्थायी समिती व आमसभा कधी होणार याचा काहीच नेम नाही. उपाध्यक्षांच्या निवडीवरुन काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्याने ते एक आयते कारण मिळाले आहे. अशात आमसभा व स्थायी समितीची सभा वाटेल तेव्हा बोलाविली जात असल्याचे खुद पालिकेचे कर्मचारीच बोलत आहेत. गुरूवारी (दि.१५) बोलाविण्यात आलेली स्थायी समितीची सभा तब्बल सात महिन्यांनंतर बोलाविल्याची माहिती आहे. मे महिन्यातील सभेनंतर स्थायी समितीची सभाच झाली नाही. मात्र अचानकच गुरूवारी स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्य होत आहे. तीन विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली असून त्यात कमी दराच्या निविदांना मंजुरी देणे, येत्या वर्षाकरिता गुंठेवारी मुदतवाढ मिळणे व बैठकी बाजाराच्या व्यापाऱ्यांना परवाने व ओळखपत्र देणे हे विषय मांडले जाणार आहेत.हे असू शकते सभा बोलविण्याचे कारणस्थायी समितीच्या सभेला पूर्वी एका मर्यादीत रकमेपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार होते. मात्र आता २५ जानेवारीच्या राजपत्रानुसार स्थायी समितीचे अधिकार अमर्यादीत करण्यात आल्याची माहिती आहे. अशात नगर परिषदेत सध्या गाजत असलेला निविदांचा विषय स्थायी समितीच्या सभेत मांडून त्यांना मंजुरी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप कंत्राटदारांचा आहे. त्यासाठीच ही सभा बोलाविण्यात आली अशाही चर्चा नगर परिषदेत सुरू आहेत.