शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

लग्न होताच नववधू झाली कुटुंबीयासोबत पसार

By admin | Updated: March 22, 2015 00:56 IST

सामान्यत: युवक वर्ग युवतींना फसविल्याच्या घटना घडतात. परंतु तुमसरातील एका तरुणाला तिरोडा तालुक्यातील एका तरुणीने लग्नाचे आमिष देऊन गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुमसर : सामान्यत: युवक वर्ग युवतींना फसविल्याच्या घटना घडतात. परंतु तुमसरातील एका तरुणाला तिरोडा तालुक्यातील एका तरुणीने लग्नाचे आमिष देऊन गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या युवतीने मंदिरात लग्न लागल्यानंतर आपल्या कुटूंबियासोबत पळ काढला. युवतीच्या अंगावर सुमारे ८० हजाराचे सोन्याचे दागिणे होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याची माहिती आहे.तुमसरातील एका युवकाचे लग्न तिरोडा तालुक्यातील विर्सी फाटा गावातील एका मुलीशी ठरले होते. दोन दिवसापूर्वी मुंडीकाटाजवळील नवेगाव येथील एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. वऱ्हाडयाचे भोजनाचा कार्यक्रम सुरु असतांना मुलीने प्रसाधनगृहाकडे जातो म्हणून ती गेली, बराच वेळ ती परत आली नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. मंदिरात लग्न लावणारा पूजारी तथा मुलीचे वडील व कुटूंबीय प्रसार झाले होते. युवकाकडील मंडळीना फसवणूक झाल्याचे समजते. वराचा लहान भावाने तुमसर पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु घटना तिरोडा तालुक्याच्या हद्दीतील असल्याने तक्रारकर्त्यांना तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले.वधूच्या अंगावर वराकडून सुमारे ८० हजाराचे दागीने दिले होते. यासंदर्भात तिरोडा येथील पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यावर दूपारी ३ पर्यंत अशी तक्रार आली नाही अशी माहिती दिली. दोन्ही कुटूंबियाच्या सहमतीने हे लग्न ठरले होते. लग्नात खर्चाला फाटा देऊन मंदिरात लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटूंबियानी घेतला होता. मंदिरातून युवती कुटूबिंयासोबत पसार झाल्याने तसे रॅकेट तर येथे सक्रीय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. अशा घटनेवर आळा बसणे आवश्यक आहे. अशा घटना या परिसरात यापूर्वी सुध्दा घडल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)