शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिडी कारखान्याची जीर्ण इमारत जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:57 IST

शहराच्या मुख्य बाजार पेठेतील १०३ वर्षे जुन्या हाजी लतीफ गणी बिडी कारखान्याची जीर्ण इमारतीचा दर्शनी भाग नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२३) बुलडोजर लावून जमीनदोस्त केला.

ठळक मुद्देइमारतीला झाले होत १०३ वर्षे : नगर परिषदेची कारवाई

ऑनलाईन लोकमततिरोडा : शहराच्या मुख्य बाजार पेठेतील १०३ वर्षे जुन्या हाजी लतीफ गणी बिडी कारखान्याची जीर्ण इमारतीचा दर्शनी भाग नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२३) बुलडोजर लावून जमीनदोस्त केला.ही इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने शेजाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. यासाठी येथील नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. विशेष म्हणजे या इमारतीत बिडी कारखाना अनेक वर्षापासून सुरु होता. येथे सुमारे १७० जण कार्यरत असून कंपनी व्यवस्थापक मोहम्मद अली, फॅक्ट्री व्यवस्थापक समीमभाई खान, रोखपाल असे चार जण रहायचे. या कारखान्यावर अनेक बिडी कामगार, ठेकेदार व कर्मचाऱ्यांची उपजिविका चालते. या इमारतीत तेंदूपत्ता, बिड्या व तंबाखूचे गोदाम आहे. तसेच पक्या बिड्या तयार करण्याकरिता तंदूर लावल्या जातो. त्या धुरामुळे शेजाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या विरोधात शेजाऱ्यांनी तक्रारी केल्या. तसेच या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याचीच दखल घेत नगर पालिकेने सक्षम संस्थेकडून जीर्ण इमारतीचे परीक्षण करवून घेतले. प्राप्त अहवालानुसार सदर इमारत जीर्ण व धोकादायक ठरविण्यात आली. इमारत पडून काही अपघात घडल्यास बिडी कारखाण्यातील तसेच समोर व मागील रहदारीच्या मार्गावरील लोकांना धोका होण्याची शक्यता होती.नगर परिषदेने सदर इमारत पाडण्याकरिता कंपनीला नोटीस दिली. कंपनीने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले. नगर पालिकेने २१ फेब्रुवारीला २४ तासाची मुदत देऊन इमारत रिकामी करुन पाडण्याची नोटीस दिली. शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ वाजतापासून इमारत पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली.वृत्त लिहिपर्यंत इमारतीचा दर्शनी भाग बुलडोजरने पाडण्यात आला होता. या वेळी मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.या कारवाहीमुळे पिडित शेजाºयांनी समाधान व्यक्त केले. शहरातील इतर अतिशय जुन्या इमारतीचे परीक्षण करुन त्यांवरही योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.