शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

तब्बल २२ दिवसानंतर सभापतींना खातेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:07 IST

जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदाची निवडणूक ३० जानेवारीला घेण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात सभापतींना खाते वाटप होण्याची अपेक्षा होती.

ठळक मुद्देजि.प.चा अजब कारभार : मुकाअचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदाची निवडणूक ३० जानेवारीला घेण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात सभापतींना खाते वाटप होण्याची अपेक्षा होती. मात्र सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर तब्बल २२ दिवसांनी खाते वाटप करण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा तहकुब झाल्यानंतर ती सुध्दा महिनाभरानंतर घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे जि.प.प्रशासनावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा वचक नसल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी पुढील अडीच वर्षाकरिता १५ जानेवारीला निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर ३० जानेवारील विषयी समिती सभापतीपदाकरीता निवडणूक घेण्यात आली होती. कृषी पशुसंवर्धन, अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य या समित्यांचे वाटप झाले नव्हते. तर महिला बाल कल्याण व समाजकल्याण समितीचे वाटप झाले होते.जिल्हा परिषदेत काँग्रेस व भाजप युतीची सत्ता असल्याने सभापतीपदाचे खाते वाटप समसमान होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र सभापतींना खाते वाटप करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातर्फे तारीख पे तारीख देत तब्बल २२ दिवसानंतर खाते वाटप करण्यात आले आहे. यात कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी शैलजा सोनवाने, अर्थ व बांधकाम सभापती अल्लाफ हमीद, तर आरोग्य व शिक्षण सभापतीपदी रमेश अंबुले यांची वर्णी लागली. तर समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे तर महिला व बालकल्याण सभापतीपदी लता दोनोडे यांची यांची पूर्वीच वर्णी लागली.विशेष म्हणजे सभापतींना खाते वाटप करण्यास संबंधित विभागाकडून हेतूपुरस्पर विलंब करण्यात आला. या काळात अधिकाऱ्यांनी मर्जीनुसार काही कामे केल्याचे बोलल्या जाते. खाते वाटपाच्या प्रक्रियेस सामान्य प्रशासन विभागाकडून विलंब होत असताना जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी एम. राजा. दयानिधी यांनी मात्र कुठलेच पाऊले उचलली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कर्तव्य दक्ष अधिकारी आणि सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारा अशी त्यांची ओळख आहे. मात्र त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.सभेपूर्वीच खातेवाटपजिल्हा परिषद विषय समिती सभापतींना खाते वाटप होण्यापूर्वीच जिल्हा परिषद आरोग्य विभाग सभापतींना खाते वाटप करुन मोकळा झाला होता. या विभागाने एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणाच्या कार्यक्रम पत्रिकेत सभापतींची नावे त्यांच्या खात्यासह प्रसिध्द केली होती. हे नियमाबाह्य असून ही चूक करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाही करणे अपेक्षीत होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक करण्यातच आनंद मानला.