शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान’ चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:00 IST

महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा मागील आठवडाभरापासून केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला लागले आहे.

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा मागील आठवडाभरापासून केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला लागले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी असून यापैकी अडीच लाख शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपर्यंत शेती असल्याची बाब कृषी व महसूल विभागाने याद्यांची छाननी केल्यानंतर पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना २ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली. याचा लाभ शेतकºयांना तीन टप्प्यात दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी या योजनेतंर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यासाठीच मागील आठवडाभरापासून महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला युध्दपातळीवर कामाला लावण्यात आले आहे.यातंर्गत जिल्ह्यातील दोन्ही विभागाच्या यंत्रणांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम मंगळवारी (दि.१२) पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी आहेत.यापैकी अडीच लाख शेतकºयांकडे दोन हेक्टर शेती असल्याची बाब याद्यांच्या छाननीनंतर पुढे आली आहे. त्यामुळे ऐवढ्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.महसूल आणि कृषी विभागाने तयार केलेल्या याद्यांचे प्रत्येक गाव स्तरावर वाचन केले जाणार आहे. त्यानंतर कृषी सहाय्यक यादीनुसार संबंधित गावातील शेतकºयांच्या कुटुंबांना भेटी देऊन नावांची खातरजमा करणार आहेत. त्यानंतर ही यादी महाआॅनलाईनवर अपलोड करुन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शेतकºयांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.मर्यादा वाढल्यास संख्येत वाढप्रधानमंत्री किसास सन्मान योजनेचा लाभ केवळ २ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक क्षेत्र असणाºया शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांची ही नाराजी ओढावून घेणे विद्यमान सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारकडून हेक्टरच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.आठवडाभरात होणार चित्र स्पष्ट२ हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ऐवढ्या कमी कालावधीत याद्या तयार करण्याचे काम प्रथमच झाल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोललते आहे. याद्या तयार करुन त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी संलग्न करण्याचे काम सुध्दा येत्या आठवडाभरात पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता मार्च महिन्यात जमा होईल यात कुठलही शंका नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी