शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कोविड रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण घटले, गृहविलगीकरणावरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 22:44 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५,३४,०६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४६,७८८ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४६,०५७ बाधित कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर ५८९ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजघडीला जिल्ह्यात १६ ॲक्टिव्ह रूग्ण असून यातील एकही रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती नसल्याचे दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अडीच वर्षांच्या कोरोनाकाळात अनेक कुटुंबांना आपले सदस्य गमवावे लागले आहेत. परंतु, वर्तमान परिस्थितीमध्ये कोविडवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे सध्या कोविडमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, रुग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रोज १-२ नागरिकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. परंतु, आता मृत्यूचे चक्र मात्र थांबले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५,३४,०६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४६,७८८ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४६,०५७ बाधित कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर ५८९ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजघडीला जिल्ह्यात १६ ॲक्टिव्ह रूग्ण असून यातील एकही रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती नसल्याचे दिसते.

सक्रिय रुग्ण गृहविलगीकरणातजिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे. रोज १-२ रुग्ण पॉझिटिव्ह येत असले, तरी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज पडत नाही. त्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेत आहेत. सध्या जिल्ह्यात १६ सक्रिय रुग्ण ते गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. 

- जिल्ह्यात अडीच वर्षांत काेरोनामुळे ५८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.- यामध्ये इतर जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे. - जिल्ह्यात काही इतर जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी दाखल होते. वर्तमान स्थितीत १६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, रोज १-२ रुग्ण पॉझिटिव्ह असले, तरी त्यांची प्रकृती गंभीर नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी झाली आहे.- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या