शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम या पार्श्वभुमीवर पुढील कोरोना संपेपर्यंत शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

ठळक मुद्देगोंदिया व आमगाव तालुक्याचा समावेश । ग्रामविकास विभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले. यानुसार गोंदिया व आमगाव तालुक्यातील २० ग्रामपंचायतवर बुधवारी (दि.३१) प्रशासक नियुक्त करण्यात आले.कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम या पार्श्वभुमीवर पुढील कोरोना संपेपर्यंत शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. जिल्ह्यातील ५४५ पैकी १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै ते डिसेंबर या कालावधीत असल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.यातील ज्या ग्रामपंचायतीच्या कमिटीची मुदत ज्या दिवशी संपते त्याच दिवशी रात्री १२ वाजतानंतर प्रशासक बसविला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींवर ३१ जुलै रोजी प्रशासक बसविण्यात आले आहेत. ग्रामीण विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती असून यापैकी १९१ ग्रामपंचायतच्या पदाधिकारी सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जुलै महिन्यात २० ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे.त्यापैकी १२ ग्रामपंचायतीवर प्रशासक अधिकारी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात २१ ग्रामपंचायतीचा कालावधी, नोव्हेंबरमध्ये सहा ग्रामपंचायतीच्या कालावधी असे एकूण १९१ ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक सद्या घेण्यात येणार नाही. परंतु कालावधी झाल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. गोंदिया तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत तिरोडा तालुक्यातील आहेत.तिरोडा तालुक्यातील २०, आमगाव २२, सालेकसा ९, देवरी २९, गोरेगाव २६, सडक-अर्जुनी १९, अर्जुनी-मोरगाव २९ अशा एकूण १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही.त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. १९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून बसविण्यासाठी विस्तार अधिकाºयांची संख्याही मोठी असायला पाहिजे होती. परंतु गोंदिया जिल्ह्यात फक्त ३८ विस्तार अधिकारी असल्यामुळे एकाच विस्तार अधिकाºयावर पाच ते सहा ग्रामपंचायतीचा भार येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत