बाराभाटी : शहराच्या तुलनेने चक्क गावागावात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील बऱ्याच गावात कोरोनाबाधित आढळत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी ताप व खोकला आदी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे गावागावात सॅनिटायझरची फवारणी करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
सर्व खेड्यापाड्यात कोरोनाचा वाढता कहर पाहून अनेक नागरिक थक्क झाले आहे. अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. अनेक वेळा साधना अभावी कोरोना तपासणी होत नाही. अशा खूप समस्या ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या केंद्रावर आढळते. या सर्व बाबीकडे प्रशासनाचे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
.....
गावातील कोरोनाचा संसर्ग थांबवा
शहरीभागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गावच्या गाव बाधित होत आहेत. त्यामुळे गावागावात कोरोना चाचणीचे शिबिर लावून तपासणी वाढविण्यात यावी. गावातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात यावा, पाण्याचे जलकुंभ स्वच्छ करून पाणी निर्जंतुक करण्यात यावे.
.....
प्रत्येक गावात जंतुनाशक फवारणीची गरज आहे. तहसील कार्यालय व पंचायत समिती यांनी फवारणी करावी, पाणी निर्जंतुक करावे, म्हणजे कोरोनाचा संसर्ग फारसा वाढणार नाही.
- मनोहर चंद्रिकापूरे, आमदार.