शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
5
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
6
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
7
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
8
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
9
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
10
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
11
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
12
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
13
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
14
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
15
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
16
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
17
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
18
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
19
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
20
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण

कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

राज्यातील सर्वच भागात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात होत्या.तर नागरिक सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत होते. जिल्ह्यात परेदशातून १२९ नागरिक आले व या नागरिकांच्या संपर्कात ६४२ नागरिक आले होते. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली होती.

ठळक मुद्देआरोग्य विभागही लागला कामाला : शहरावासीयांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण गोंदिया शहरात आढळल्यानंतर जिल्हावासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सुध्दा अ‍ॅक्शन मोडवर आला आहे.राज्यातील सर्वच भागात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात होत्या.तर नागरिक सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत होते. जिल्ह्यात परेदशातून १२९ नागरिक आले व या नागरिकांच्या संपर्कात ६४२ नागरिक आले होते. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली होती. त्यात एकालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळले नाही. तर पाच संशयीतांचे नमुणे कोरोना निगेटीव्ह आढळून आले. त्यामुळे प्रशासन थोड बिनधास्त होते. मात्र दहा दिवसांपूर्वी बँकांकहून गोंदिया येथे परतलेल्या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे शुक्रवारी (दि.२७) प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सदर कोरोना बाधीत युवक हा दहा दिवसांपूर्वीच गोंदिया आला असून या कालावधीत तो अनेकांच्या संपर्कात आला.दोन दिवसांपूर्वीच त्यांने आपल्या मित्रांसह क्रिकेट सुध्दा खेळले. तर शहरातील एका कॉलनीत तो सर्वाधिक वेळ घालवित होता. शुक्रवारी त्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना पाझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या चमूने सदर युवकाच्या कुटुंबीयांना सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन घेतले आहे.सदर कोरोना बाधीत रुग्णांवर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षातच उपचार करण्यात येणार आहे. यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा येथे उपलब्ध असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.संपर्कात आलेल्यांचा शोध सुरूशहरातील एका २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यानंतर तो दहा दिवसांच्या कालावधी तो नेमका कुणा कुणाच्या संपर्कात आला याची माहिती आरोग्य आणि पोलीस विभागाचे अधिकारी शुक्रवारी घेत होते. संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सुध्दा क्वारेंटाईन करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.तपासणी मोहीम राबविणारशहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्याला वेळीच प्रतिबंध लागवा यासाठी आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या वतीने शहरात होम टू होम जाऊन आरोग्य तपासणी व माहिती घेण्यात येणार आहे.युवकांने माहिती लपविल्याने समस्यागोंदिया येथील हा युवक राजनांदगाव येथील ज्या युवकांसोबत बँकांक ला गेला होता. त्यापैकी दोन मित्रांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तीन चार दिवसांपूर्वी कळेल. यानंतर या युवकाने सुध्दा स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळेच आरोग्य विभागाच्या चमूने त्याच्या घरी जावून त्याला मेडिकलमध्ये बुधवारी रात्रीच दाखल करुन घेतले.नागरिकांनी घाबरु नयेगोंदिया येथे कोरोना बाधीत एक रुग्ण आढळल्यानंतर शहर आणि जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सदर बाधीत रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून घाबरण्याचे कसलेही कारण आहे. मात्र नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी दिला आहे.नागरिकांनो घरातच राहाराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. तर रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन घराबाहेर पडणे टाळावे.नागरिकांनी घरातच राहून आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन लोकमतने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस