शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

आदिती भक्तवर्ती जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती. बारावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीतजास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यामुळेच आपला पाल्य चांगले गुण उर्तीण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते यासाठीच ते सुद्धा वर्षभर मेहनत घेत असतात.

ठळक मुद्देविभागात जिल्हा पहिल्या स्थानी : शांताबेन मनोहरभाई पटेल शाळेची परंपरा कायम, ४३ विद्यालयांचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) जाहीर करण्यात आला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ९४.१३ टक्के लागला आहे. येथील शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आदिती भक्तवर्ती हिने सर्वाधिक ९४.९२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्लोरी कटरे हिने ९४.६२ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी प्रीतीश मस्के व अवंती राऊत यांनी ९३.६९ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती. बारावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीतजास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यामुळेच आपला पाल्य चांगले गुण उर्तीण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते यासाठीच ते सुद्धा वर्षभर मेहनत घेत असतात.यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २० हजार २८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १९ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही जिल्हा नागपूर विभागात अव्वल राहिला असून ९४.१३ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ११० विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. यापैकी नऊ हजार ९६३ विद्यार्थी (९८.५५) उत्तीर्ण झाले. कला शाखेचे एकूण आठ हजार ८१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सात हजार ८६८ विद्यार्थी (८९.२९) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचे एकूण ९२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८७७ विद्यार्थी (९४.८१) उत्तीर्ण झाले.तर व्होकेशनल शाखेच्या एकूण ४३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३८४ विद्यार्थी (८८.२८) उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे, मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त असतानाच जिल्ह्यातील टॉप-३ मध्ये मुलीच आघाडीवर दिसून येत असल्याने सावित्रीच्या लेकींनी ‘हम किसी से कम नही’ हे दाखवून दिले आहे.अर्जुनी-मोरगाव तालुका सरसमागील २-३ वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील निकालाच्या टक्केवारीत सातत्याने सुधारणा होत आहे. यंदा गोंदिया येथील शांताबेन मनोहरभाई पटेल विद्यालयातील विद्यार्थिनी आदिती भक्तवर्ती हिने ९४.९२ टक्के गुण घेवून जिल्ह्यात अव्वल ठरली. असे असतानाच तालुक्यांचे निकाल चांगले येत असून तालुकानिहाय निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुका सरस ठरला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा निकाल ९७.७५, गोंदिया ९२.४०, आमगाव ९५.५६, देवरी ९३.५१, गोरेगाव ९१.७२, सडक-अर्जुनी ९२.८७, सालेकसा ९७.४६ तर तिरोडा तालुक्याचा निकाल ९५.२२ टक्के लागला आहे.यंदाही सावित्रीच्या लेकीच पुढेगुरूवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच पुढे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण नऊ हजार ९४० विद्यार्थिनींंनी परीक्षा दिली. त्यापैकी नऊ हजार ५१० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी ९५.६७ एवढी आहे. तर एकूण १० हजार ३४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी नऊ हजार ५८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९२.६५ एवढी आहे. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतल्याचे दिसते.विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कलजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढत असल्याचे आता दिसून येत आहे. दरवर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून अशात त्यांच्या निकालाची टक्केवारी सुद्धा सुधारत आहे. यंदा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.५५ टक्के, कला शाखेचा ८९.२९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.८१ टक्के आणि व्होकेशनल शाखेचा ८८.२८ टक्के लागला आहे. यावरुन विज्ञान शाखेची टक्केवारी वाढत असल्याचे दिसते.सीबीएसई अभ्यासक्रमाकडे वाढतोय कलमहाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाऐवजी सीबीएसई अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल अधिक असून निकालाची टक्केवारी सुद्धा अधिक आहे. त्यामुळेच सीबीएसई निकालात १०० टक्के निकाल देणाºया शाळा मात्र महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालात माघारल्याचे चित्र आहे.४३ विद्यालयांनी मारली सेंच्युरीदरवर्षी निकालात सुधारणात होत असल्याचे दिलासादायक चित्र असताना मात्र यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १०० टक्के निकाल देणाºया शाळा घटल्या आहेत. बारावीच्या निकालात जिल्ह्यातील ४३ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक विद्यालय गोंदिया तालुक्यातील असून त्या पाठोपाठ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विद्यालयांचा समावेश आहे.तीन वर्षांनी गोंदिया तालुक्याने उघडले खातेमागील २-३ वर्षांच्या बारावीच्या निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास अर्जुनी-मोरगाव तालुका निकालात सरस ठरला होता. शिवाय याच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले होते. मात्र या तालुक्याचा हा विक्रम मागील वर्षी प्रमाणेच यंदाही गोंदिया तालुक्याने मोडीत काढला असून येथील शांताबेन मनोहरभाई पटेल विद्यालयातील विद्यार्थिनी आदिती भक्तवर्ती हिने विज्ञान शाखेतून ९४.९२ टक्के गुण घेवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले. तर येथीलच धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्लोरी कटरे हिने ९४.६२ टक्के गुण घेऊन द्वितीय तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी प्रीतीश मस्के व अवंती राऊन यांनी ९३.६९ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.व्होकेशनल शाखेच्या निकालात सुधारणाविद्यार्थ्यांचा कल सध्या प्रामुख्याने विज्ञान व वाणिज्य शाखेकडे असल्याचे दिसून येते. विद्यार्थी या दोन शाखांप्रतीच जास्त आकर्षण बाळगतात. असे असतानाच मात्र विज्ञान आणि वाणिज्य शाखेसह व्होकेशनल शाखेकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे निकालातून दिसून आले. त्यामुळे या शाखेच्या निकालात मागील वाढ झाली असल्याचे दिसते. यंदा व्होकेशनल शाखेचा निकाल ८८.२८ टक्के लागला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.१०० टक्के निकालात माघारनागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे. असे असतानाच मात्र १०० टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या महाविद्यालयांनी निराशा ही केली आहे. जिल्ह्यातील कित्येक कनिष्ठ महाविद्यालय आपल्या निकालासाठी ख्यात आहेत. यंदा मात्र यातील कित्येकांनी १०० टक्के निकाल न दिल्याने सर्वांनाच आश्चर्य होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ५० च्या घरात कनिष्ठ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल देत आपली कामगिरी दाखवून दिली होती. यंदा मात्र कित्येक नावाजलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी ही परंपरा मोडून टाकल्याचे दिसले. यंदा जिल्ह्यात गोंदिया तालुक्यातील १५, आमगाव तालुक्यातील २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६, देवरी तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील ५, सडक-अर्जुनी तालुक्यातील ५, सालेकसा तालुक्यातील ६ तर तिरोडा तालुक्यातील २ कनिष्ठ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विशेष म्हणजे, आमगाव व तिरोडा तालुक्याने प्रत्येकी फक्त २ कनिष्ठ महाविद्यालयच दिल्याने १०० निकाल देणाऱ्या शाळांची यादी यंदा घटली आहे. सीबीएसई बोर्डात १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा राज्याच्या अभ्यासक्रमात माघारत असल्याचे निकालातून बघावयास मिळाले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल