लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील मुंडीपार येथील एका वृध्दाचा कोरोनामुळे नागपुरातील रुग्णालयात गुरूवारी (दि.२६) मृत्यू झाला. या वृध्दाचा संपर्कात आलेल्या ३० जणांना जिल्हा आरोग्य विभागाने शुक्रवारी क्वारंटाईन केले होते. यापैकी सहा जणांचे आणि मुंबईहून परतलेल्या एका जणाचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल रविवारी (दि.२८) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात सात कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा १० वर पोहचला आहे.मुंडीपार येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील शासकीेय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. सदर वृध्दाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आरोग्य विभागाने सदर वृध्द काम करीत असलेल्या कंपनीतील व्यक्ती आणि त्यांना नागपूर येथे दाखल करण्यापूवी गोंदिया येथे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना शुक्रवारी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर ४० ते ५० जणांचे स्वॅब नमुने घेवून गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६ जणांचा अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. यात गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव, फत्तेपूर, मुंडीपार, सेजगाव, गोंदिया येथील एकूण सहा व्यक्तींचा समावेश आहे. सदर व्यक्ती हे मृतक वृध्द ज्या कंपनीत कार्यरत होता त्याच कंपनील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरा एक रुग्ण हा मुंबईहून परतलेला आहे. या सर्व कोरोना बाधित रुग्णांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.जिल्ह्यात रविवारी आठ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ११ वर पोहचला आहे.२६ मार्च ते २८ जूनपर्यंत एकूण ११२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १०२ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आतापर्यंत आपल्या घरी परतले आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये वाढरविवारी जिल्ह्यात ७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली. यात गोंदिया शहरातील कुंभारेनगर,फत्तेपूर, डोंगरगाव, या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ कंटेन्मेंट झोन आहेत.२५३८ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण २६४० स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६४० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ११२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर २५३८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. १३७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलबिंत आहे.
जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST
मुंडीपार येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील शासकीेय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. सदर वृध्दाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आरोग्य विभागाने सदर वृध्द काम करीत असलेल्या कंपनीतील व्यक्ती आणि त्यांना नागपूर येथे दाखल करण्यापूवी गोंदिया येथे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना शुक्रवारी क्वारंटाईन करण्यात आले होते.
जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर
ठळक मुद्देमृताच्या संपर्कात आलेल्यांचे वाढले टेंशन : अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा दहावर