गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरीही दररोज पडणारी बाधितांची भर हळुवार का असेना मात्र रुग्णांचा आकडा वाढवतच आहे. गुरुवारी (दि. २८) १८ नवीन बाधितांची भर पडली असून, १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, पुन्हा बाधित जास्त व मात करणारे कमी अशी आकडेवारी बघावयास मिळत आहे. यानंतर आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १४,१७५ एवढी झाली असून, १३,८४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता जिल्ह्यात १४४ रुग्ण क्रियाशील आहेत.
गुरुवारी आढळून आलेल्या १८ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १०, तिरोडा ३, गोरेगाव २, आमगाव २ तर देवरी तालुक्यातील १ रुग्ण आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्या १४ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ६, गोरेगाव १, आमगाव ४, सालेकसा १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यात १४४ रुग्ण क्रियाशील असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ९०, तिरोडा ७, गोरेगाव ७, आमगाव १५, सालेकसा १०, देवरी ६, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत.
------------------------------
आतापर्यंत १८२ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत १८२ रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०१, तिरोडा २३, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूदर १.२० टक्के तर बरे होण्याचे प्रमाण ९६.९० टक्के नोंदण्यात आले आहे.
---------------------
७० रुग्ण घरीच अलगीकरणात
जिल्ह्यात आता १४४ रुग्ण क्रियाशील असून, यातील ७० ररुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३, तिरोडा ३, गोरेगाव ४, आमगाव ७, सालेकसा ६, देवरी ४, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.