शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

जुन्या नोटांनी भरलेल्या ट्रकवर आरटीओची कारवाई

By admin | Updated: December 22, 2016 01:09 IST

भिलाईवरुन नागपूर रिझर्व बँकेत अब्जावधी रुपयाची रोकड घेऊन जाणाऱ्या अतिरिक्त भारक्षमतेच्या वाहनावर ....

रिझर्व्ह बँकेचा पैसा : वजन जास्त असल्यामुळे झाली कारवाई देवरी : भिलाईवरुन नागपूर रिझर्व बँकेत अब्जावधी रुपयाची रोकड घेऊन जाणाऱ्या अतिरिक्त भारक्षमतेच्या वाहनावर मंगळवारी दुपारी देवरी सिमा तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी केल्याने बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ५०० व हजार रुपयाच्या जून्या नोटांनी भरलेला ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ०६७३ मंगळवारी दुपारी २ च्या दरम्यान देवरी सीमा तपासणी नाक्यावर पोहोचला. तेथील काट्य़ावर गाडी पोहोचताच त्यात पाच टन अतिरिक्त भार असल्याने तेथे कार्यरत वाहन निरीक्षक यांनी नियमानुसार वाहनावर कारवाई केली. पाच टन भार असल्याने ३० हजार रुपये दंड वाहनाकडून आकारण्यात आला. वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मोटर वाहन कायदा १९९८ च्या कलम ११३, ११४ नुसार अतिरिक्त भारक्षमता असल्याने या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार अतिरिक्त भार दुसऱ्या वाहनात क्रांसींग केल्याशिवाय व दंड भरल्याशिवाय या वाहनाला सोडता येणार नाही. सध्या या वाहनात अब्जावधींची रक्कम असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने देवरी पोलीस स्टेशनमध्ये वाहन जमा करण्यात आले आहे. दुसरीकडे या वाहनासोबत सुरक्षा कर्मचारी व बँक कर्मचारी असल्याने त्यांनी भिलाई ते नागपूरच्या बँक अधिकाऱ्यांनी वाहन निरीक्षकांना वाहन सोडण्याची विनंती केली. परंतु नियमानुसारच वाहन सोडणार अशी भूमिका वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी घेतल्याने बँक प्रशासनात एकच खळबळ माजली होती. उच्च अधिकाऱ्यांचे फोन आल्यावर दंड आकारून त्या वाहनाला सोडण्यात आले. १६२०० टन क्षमतेची परवानगी असताना या वाहनाचे वजन २१२०० होते. (प्रतिनिधी)