शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

महिनाभरातील कारवाई : सहा बालकांना केले पालकांच्या स्वाधीन

By admin | Updated: February 11, 2016 02:04 IST

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन ...

आॅपरेशन ‘स्माईल टू’मुळे बालकांना मिळाले मायबापगोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन ‘स्माईल टू’ मुळे बेपत्ता असलेल्या सहा बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले.बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना शोधण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान राबवून जुलै महिन्यात ३१ बालके पकडले होते. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाल्याने पोलीस विभागाने १ ते ३१ जानेवारीदरम्यान आॅपरेशन मुस्कान टू हा अभियान राबवून महिनाभरात ६ बालकांना पकडण्यात यश आले. त्या बालकांना त्यांच्या आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. सापडलेली सर्व बालके त्यांच्या मातापित्यांच्या सोबत आता राहू लागली आहेत. या सहा बालकांपैकी एक बालक परराज्यातील आहे. जिल्हा पोलिसांनी आॅपरेशन मुस्कान अभियान राबवून १ ते ३१ जुलै या महिन्यात ३१ बालकांचा शोध घेतला आहे. यातील ७ मुले व १६ मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर ७ मुले एक मुलीला बालक समितीसमोर सादर करण्यात आले होते. अश्या एकूण ३१ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आॅपरेशन मुस्कान प्रकल्प राबविण्यात आला. मात्र या अभियानाला नागरिकांनी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केले नाही.मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान टू ही मोहीम राबविली. बालकांना शोधण्यासाठी आॅपरेशन मुस्कान अभियानासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी लावले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान राबविला आहे. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थाची मदत मिळाली नाही हे विशेष. जुलै महिन्यात या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शासनाने पुन्हा हे अभियान राबविले आहे. (तालुका प्रतिनिधी)सामाजिक संघटना कधी जागणार?गोंदियात समाजेसेवी संस्था शेकडोच्या घरात आहेत. मात्र आॅपरेशन मुस्कानच्या कामात गोंदिया जिल्ह्यातील एकाही सामाजिक संघटनेने मदत केली नाही. महत्वाच्या कामात सहकार्य न करणाऱ्या संस्था मग कोणत्या कामाच्या आहेत? अशा प्रतिक्रिया पोलीस विभागात उमटत आहेत. चार मुले व दोन मुलींचा समावेशआॅपरेशन मुस्कान टू या अभियानात जानेवारी महिन्यात शोध घेतलेल्या बालकांमध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत एक मुलगा, रामनगर एक मुलगा, रावणवाडी दोन मुली, डुग्गीपार एक मुलगा व सालेकसा एक मुलगा अश्या सहा जणांचा समावेश आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत पकडण्यात आलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी परराज्यातील म्हणजे मध्यप्रदेशातील होती.