शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 21:53 IST

जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा जप्त केला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुध्द कंबर कसल्याने त्याचा फायदा पोलिसांना होत आहे.

ठळक मुद्देदारूसाठा जप्त : पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा जप्त केला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुध्द कंबर कसल्याने त्याचा फायदा पोलिसांना होत आहे.नवेगावबांधच्या रेल्वेटोली येथील सुर्यकांता मधुकर उके (५०) यांच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया पालांदूर येथील एक अज्ञात इसम एमएच ३५ एडी ४७४० या मोटारसायकलवर १४० नग देशी दारूचे पव्वे घेवून जात होता. पोलिसांना पाहून तो पळून गेला. तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा येथील देवीबाई हदीमित्र मोटघरे (४७) हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, संत सजन वॉर्ड तिरोडा येथील वनमाला भिमराव झाडे (४०) हिच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारु, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया अदासी येथील कांता राजेश्वर शेंडे (४५) या महिलेकडून पाच लिटर हातभट्टीची दारू, आसोली येथील निर्मल उद्धव मेश्राम (४९) हिच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारू, बेरडीपार येथील रविंद्र हरिराम उके (४२) यांच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. मंजू रुपचंद केवट (३३) रा. लालपहाडी मुर्री हिच्याकडून ५ लिटर, मंजू निशांत मेश्राम (३२) रा. भिमनगर हिच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारू, कुऱ्हाडी येथील हिवराज अंबिलाल उईके (४०) याच्याकडून दोन लिटर हातभट्टीची दारू, बेलटोला येथील राजकुमार धनसिंग पंधरे (४५) यांच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारू, आंबेडकर चौक कुडवा येथील सुकचंद सुरजलाल हटेवार (४८) याच्याकडून दहा लिटर देशी दारूचे पव्वे, दिनदयाल वॉर्ड रामनगर येथील देवीदास बालनदास मेश्राम (६०) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, कोटजंभुरा येथील पंचफुला गणेश बुरले (५०) हिच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे, चांदसुरज येथील सुरज जियालाल दºरो (२६) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, पातरगोटा येथील पतीराम मोहन भलावी (३५) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, माहुरकुडा येथील श्रीराम नारायण गोडपल्लीवार (५४) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे, कैलास कन्हैयालाल सिंगमारे (५०) रा. आमगाव याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, खोडशिवणी येथील श्रीेराम तेजराम सुर्यवंशी (३१) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, शिशुपाल प्रकाश पटले (२३) रा. नवेगाव याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, रतनारा येथील विनोद गजानन बिजेवार (४२) याच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे जप्त केले. सदर आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी