शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही.  प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा  पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत  असताना गावकऱ्यांनी पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले-रेंगेपार अंतर्गत जीतलाल अंबुले यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने तोड करण्यात आली.  शेतालगत असलेल्या कुरण जंगलातील झाडे अवैधरित्या कापण्यात आली. कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही.  प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा  पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत  असताना गावकऱ्यांनी पकडले. याप्रकरणी दोषी बीटरक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सविस्तर असे की, सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगल-रेंगेपार अंतर्गत येणाऱ्या जीतलाल अंबुले (रा. रेंगेपार) यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने कटाई करण्यात आली होती. शेताला लागून उत्तर दिशेला कुरण आहे. त्या जंगलातील सागवान झाडे अवैधरित्या कापून एकत्र ठेवली होती. मात्र, वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही.  अवैध वृक्षतोड प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. या संदर्भात क्षेत्रसहाय्यक कोसमतोंडी यांनी मला कसलीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले होते. मात्र, प्रकरण अंगलट येणार,  या भीतीपोटी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता लाकडे ट्रॅक्टरमध्ये भरली. ही माहिती रेंगेपार-पांढरीवासीयांना मिळताच गावकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला व वनकर्मचाऱ्यांच्या अवैध प्रकाराला नागरिकांनी उजेडात आणले. प्रकरणाविषयी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकाराला संबंधित वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बीटरक्षकांकडे हातोडा नेहमीच असायला पाहिजे. हातोडा न मारताच व पंचनामा न करताच लाकडे रात्रीच व तीही मध्यरात्री दरम्यानच का उचलण्यात आली. ही लाकडे सहवनक्षेत्रातच की अन्य इतरत्र नेऊन विल्हेवाट लावली जाणार होती असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, या लाकडांची माहिती संबंधित बीटरक्षकांना असून प्रकरण उजेडात आल्यानंतरच लाकडाची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने आखणी करण्यात आल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यामुळे यातील दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग