शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:25 IST

शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती मोहीम : १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्ह्यात दरवर्षी रस्ते अपघातात दीडशे मोटारसायकल चालकांचा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे मृत्यु होतो. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे सर्वाधिक मृत्यु होत असल्याची बाब देखील पुढे आली आहे. तर पालक आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हाती मोटारसायकल देतात. त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्यामुळेच अपघातात घडतात.दरम्यान जिल्ह्यातील अपघाताच्या घटनांचा वाढता ग्राफ कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी शहर आणि ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेदरम्यान वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व हेल्मेटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.शहरात आत्तापर्यंत शेकडो वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तर १२ नोव्हेबंरपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती मोहीमेतंर्गत तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे मोटारसायकल चालकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.देवरी येथे मोटारसायकल जप्तदेवरी येथे हेल्मेट सक्ती मोहीमेतंर्गत गुरूवारी (दि.१५) मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणाºया वाहन चालकाच्या ४० ते ५० मोटारसायकल जप्त करुन देवरी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.सक्ती ठीक मात्र गुणवत्तेकडे दुर्लक्षजिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी व वाढते अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. मोहीम योग्य असली तरी हेल्मेटच्या गुणवत्तेकडे मात्र या विभागासह वैद्यमानशास्त्र विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. विक्रेते सक्तीचा फायदा घेत आयएसआय मार्क व गुणवत्ता नसलेल्या हेल्मेटची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर केल्यानंतरही गुणवत्ताहिन हेल्मेटमुळे एखाद्या वाहन चालकाचा मृत्यु झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाहतुकीची कोंडी कायमवाहतूक नियंत्रण विभागाची सर्व यंत्रणा सध्या हेल्मेट सक्ती मोहीमेत व्यस्त आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले असून शहरातील वाहतुकीची कोंडी कायम आहे. शहरातील बाजारपेठ परिसरात राबविण्यात आलेला वन वे पार्किंगचा प्रयोग देखील पूर्णपणे फसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे सुध्दा या विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस