शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी चार तासात ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

तो पोलीस कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला होता. दरम्यान सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला झटका देत भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. दरम्यान आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवित बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव जवळील आरंभा घोटी गावातून  अवघ्या चार तासात ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव :  १७ वर्षीय बालकाचा खंडणीसाठी खून करणारा आरोपी पोलीस कोठडीत असताना शौचालयाच्या बहाणाने पोलीस स्टेशनच्या सुरक्षा भिंतीवरून उडी घेऊन पळाल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपीला आमगाव पोलिसांनी चार तासात बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव जवळील आरंभा घोटी येथून अटक केली. दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील चेतन नरेश खोब्रागडे  या १७ वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी आरोपी दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (२४) रा. नवेगाव खैरलांजी, मध्यप्रदेश याला अटक केली होती. तो पोलीस कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला होता. दरम्यान सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला झटका देत भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. दरम्यान आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवित बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव जवळील आरंभा घोटी गावातून  अवघ्या चार तासात ताब्यात घेतले. आरोपी मिळताच पोलिसांचा जीव सुद्धा भांड्यात पडला.

 गावकऱ्यांनी ठेवले आरोपीला पकडून - आरोपीला सध्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी पोलीस स्टेशन मधून पसार झाला होता.  आरोपी हा आपल्या बहिणीच्या गावी आरंभा घोटी येथे आपली मोटारसायकल घेण्यासाठी गेला होता. परंतू पोलिसांनी आधीच नातेवाईक व गावकऱ्यांना आरोपी पसार झाल्याची माहिती दिल्यामुळे आरोपी गावात आला असता गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

वेटरचे काम करणाऱ्या दुर्गाप्रसादने का केला खून ?- खून झालेल्या चेतनचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात अशा कुटुंबातील मुलाचे अपहरण करून १० लाख रुपयांची मागणी करून खून करणे यामागे काहीतरी वेगळे कारण असल्याची चर्चा आमगाव तालुक्यात सुरू आहे. आरोपी हा मध्यप्रदेशातील नवेगाव खैरलांजी येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून शहरातील नामांकित हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. आमगावला भाड्याने राहत होता. या आरोपीने गरीब कुटुंबातील मुलाचा अपहरणाचा कट का रचला असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी