शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अपघात नसून घातपात असल्याचा आरोप

By admin | Updated: September 3, 2015 01:33 IST

दाभना ते सुकडी फाटा मार्गावर असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात कुंभीटोला येथील लक्ष्मण बिसन भंडारी या इसमाचे प्रेत पाण्यात तरंगताना आढळून आले.

अर्जुनी-मोरगाव : दाभना ते सुकडी फाटा मार्गावर असलेल्या रेल्वेच्या भूमिगत बोगद्यात कुंभीटोला येथील लक्ष्मण बिसन भंडारी या इसमाचे प्रेत पाण्यात तरंगताना आढळून आले. हा अपघात नसून त्याची हत्या झाली असावी असा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.रेल्वे प्रशासनातर्फे दाभना ते सुकडी फाटा दरम्यानच्या रस्त्यावर भूमिगत बोगदा तयार करण्यात आला. या बोगद्यातील पाण्यात २७ आॅगस्ट रोजी प्रेत तरंगतांना आढळून आले. मृतकाच्या कुटुंबीयांशी त्यांच्याच घराण्यातील काही इसमांशी जमिनीचा वाद आहे. या ववादातून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तंटामुक्त समिती व पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीवर २५ आॅगस्ट रोजी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. या प्रकरणाचा निपटारा झाल्यानंतर मृतक घरी परतलाच नाही. २७ आॅगस्ट रोजी त्याचे प्रेत बोगद्यात आढळून आले. दुसरे दिवशी प्रेत बघीतल्यानंतर ते लक्ष्मणचे असल्याचे निदर्शनास आले. पे्रताची शहानिशा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातून ताब्यात घेऊन त्यावर कुटुंबियांनी अंत्यविधी केला. त्यानंतर संशयितांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रार द्या असे पोलिसांनी सांगितले. प्रेताची पाहणी केल्यानंतर शवचिकित्सा केल्याचे दिसून आले नाही. असा आरोप करण्यात आला. पाण्यात तरंगत असलेल्या पे्रतावरुन हा अपघात नसून हत्या असल्याच्या संशयास्पद बाबी असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.