शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: June 10, 2024 16:51 IST

मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते.

गोरेगाव : हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील लांजी येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता घडली. थानसिंग यादव (३०, रा. रेलवाडी, जि. बालाघाट) असे मृतक मजुराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. सोमवारी सकाळी हैदराबादवरून जवळपास ५० ते ६० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक एमपी १३-पी ७९९९) मध्य प्रदेशातील लांजीकडे जात असताना गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर मिलटोलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांच्या घरावर ट्रॅव्हल्स धडकली. यात चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. दरम्यान, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना थानसिंग यादव या मजुराचा मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे. ६ किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.हे झाले अपघातात गंभीर जखमी -साहिल धनलाल काळसर्पे (२२), गजानन उईके (२४), अशोक काटीवाल (२१, सर्व रा. बालाघाट), गीता लटारे (३८ रा. लांजी), जयपाल गावड (३८ रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे (४० रा. परसवाडा), राजेश पुसाम (२६ रा. भजेपार), शैलेश परते (३२ रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरूराम नागपुरे (५०, रा. वारासिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व रा. नरसाळा, वारासिवनी, जि. बालाघाट, म. प्र.) किरकोळ जखमींची नावे आहेत.मोठा अनर्थ टळला -हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील एका घरावर धडकली. यात घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा या घरात राहणारे सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठी जीवित हानी टळली.खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचेगेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद यादरम्यान तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत आहेत. दररोज सायंकाळी लांजी येथून, तर हैदराबादवरून रात्री २ वाजता ट्रॅव्हल्स सोडण्यात येते. रात्रभर प्रवास केला जातो. अनेकदा चालकाला डुलकी येऊन वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलिस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातpassengerप्रवासी