शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९० टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

नरेश रहिले गोंदिया : सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये अपडेट करायचे आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

नरेश रहिले

गोंदिया : सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये अपडेट करायचे आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन विभागाने २ लाख १० हजार ९१४ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ९०.६५ टक्के आधार कार्ड अपडेट झाले असून ९.३५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाही. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी आधार कार्ड गोळा केले.

गोंदिया जिल्हा परिषदेने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात गोंदिया जिल्ह्यात प्राथमिकच्या १२५२ शाळा असून या शाळात १ लाख ५१ हजार ६९२ विद्यार्थी आहेत. यापैकी १ लाख ३८ हजार ३६५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले आहे. १३ हजार ३२७ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही. प्राथमिक विभागातील ९१.२१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहेत तर ८.७९ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही. माध्यमिकच्या १८१ शाळा असून या शाळांत ४१ हजार ८५८ विद्यार्थी आहेत. यापैकी ३७ हजार १५८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले आहे. ४ हजार ७०० विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट नाही. माध्यमिक विभागातील ८८.७७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहे तर ११.२३ टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट नाही. उच्च माध्यमिकच्या २३० शाळा असून या शाळांत ३९ हजार १०७ विद्यार्थी आहेत. यापैकी ३५ हजार ३९१ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले आहे. ३ हजार ७१६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही. उच्च माध्यमिक विभागातील ९०.५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहे तर ९.५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही.

...........................................

२१७४३ विद्यार्थ्यांचे आधार कधी होणार अपडेट?

गोंदिया जिल्ह्यात एकूण १६६३ शाळा असून या शाळांत २ लाख ३२ हजार ६५७ विद्यार्थी आहेत. यापैकी २ लाख १० हजार ९१४ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले आहे. २१ हजार ७४३ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट नाही. जिल्ह्यातील ९०.६५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहे तर ९.३५ टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट नाही. ते कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

.............

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी प्रमाण

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट- ९०.६५ टक्के

प्राथमिक विभाग-९१.२१ टक्के

माध्यमिक विभाग-८८.७७ टक्के

उच्च माध्यमिक विभाग-९०.५० टक्के