शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक द्रव्याने भरलेल्या ट्रकची हाेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा-देवरी मार्गाने रासायनिक द्रव भरलेला डब्ल्यूबी २३, ई ३०९३ क्रमांकाचा ट्रक कोलकत्याकडे जात असताना या मार्गावरील ससेकरण घाटातील देवपायली नाला परिसरात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रकला अचानक आग लागली. ही चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच ते ट्रकच्या बाहेर पडले. 

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : कोहमारा-देवरी महामार्गावरील ससेकरण देवस्थान घाटात रासायनिक द्रव्य वाहून नेणारा ट्रक जळून भस्मसात झाल्याची रविवारी (दि.१३) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सकाळी बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा-देवरी मार्गाने रासायनिक द्रव भरलेला डब्ल्यूबी २३, ई ३०९३ क्रमांकाचा ट्रक कोलकत्याकडे जात असताना या मार्गावरील ससेकरण घाटातील देवपायली नाला परिसरात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रकला अचानक आग लागली. ही चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच ते ट्रकच्या बाहेर पडले. यानंतर या घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगळे आणि महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकमधील ज्वलनशील पदार्थामुळे काही वेळातच जळून खाक झाला. या घटनेत ट्रकचा चालक व वाहक सुरक्षित असून, सकाळपर्यंत मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दरम्यान, सडक अर्जुनी, देवरी, गोंदिया याच्या अग्निशामक गाडीच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. अशोक टोलनाका व अग्रवाल बिल्डकॉनच्या क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार व्यंकट नागपुरे करीत आहे.

 

टॅग्स :fireआग