शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात जाणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 20:20 IST

Gondia News पोलीस कर्मचारी संकेत अनिलकुमार शुक्ला (३४) रा. आरटीओ कार्यालयाच्या मागे पाठक कॉलनी गोंदिया हे मोटरसायकलने पत्नीसाेबत गोंदिया शहरात शनी मंदिरात येत असतांना त्यांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.

नरेश रहिलेगोंदिया: पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी संकेत अनिलकुमार शुक्ला (३४) रा. आरटीओ कार्यालयाच्या मागे पाठक कॉलनी गोंदिया हे मोटरसायकलने पत्नीसाेबत गोंदिया शहरात शनी मंदिरात येत असतांना त्यांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता घडली.

शनिवार असल्यामुळे आणि कामाला सुट्टी असल्यामुळे पोलीस कर्मचारी संकेत अनिलकुमार शुक्ला (३४) हे आपल्या पत्नीला मोटारसायकलवर घेऊन गोंदिया शहरात येत होते. परंतु बजरंग नगरच्या होंडा शोरूम जवळ ते आल्यावर आपण पूजेचे साहित्य घरीच विसरलो हे त्यांच्या लक्षात येताच घरी साहित्य आणण्यासाठी लगेच गाडी वळविली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाने त्यांच्याशी हुज्जत घालत शिविगाळ केली.

कॉल करून आपल्या लोकांना बोलाविले आणि चौघांनी पोलीस कर्मचाऱ्याला काठीने मारून गंभीर जखमी केले. मारहाण करणारे आरोपी आफताब आबीद शेख (२३), आबीद रमजान शेख (४३) दोन्ही रा. कवलेवाडा रोड ऑक्सीजन गोदामासमोर फुलचूरपेठ गोंदिया, मतीन उर्फ सोनू राशीद खान (२३) रा. मसीदजवळ आयटीआय चौक फुलचूर व एक महिला अश्या चौघांनी त्यांना मारहाण केली. गोंदिया शहर पोलिसांनी चारही आरोपींवर भादंविच्या कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी