शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींचा कळप देवरी तालुक्याच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 21:07 IST

चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३०० फूट अंतरावर येऊन काही वेळ थांबल्यानंतर परत जंगलाच्या दिशेने निघून गेले. पण ते कधी पुन्हा येणार याची काही शाश्वती नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेल्या हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात पुन्हा एन्ट्री केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात धानपिकांचे नुकसान केले. त्यानंतर या कळपाने आता देवरी तालुक्याच्या दिशेने मोर्चा वळविला असून चिचगड पासून २० किमी अंतरावर असलेल्या चिमणटोला गावात गुरुवारी (दि. ९) रात्री प्रवेश करून कापणी करून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी आणि  गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार चिचगड वन परिक्षेत्रापासून २० किमी अंतरावरील चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३०० फूट अंतरावर येऊन काही वेळ थांबल्यानंतर परत जंगलाच्या दिशेने निघून गेले. पण ते कधी पुन्हा येणार याची काही शाश्वती नाही. या घटनेची माहिती मिळताच चिचगड वनपरिक्षेत्राधिकारी संगीता ढोबळे यांनी चिमणटोला गावाला आपल्या चमूसह भेट दिली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून गावकऱ्यांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुधवारी हत्तीच्या कळपाने अर्जुनी  मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, उमरपायली व नागणडोह परिसरात हजेरी लावली होती. उमरपायली येथील शेतातील धानपिकांचे नुकसान करून हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. पण गुरुवारी रात्रीच्या सुमारास  पुन्हा याच परिसरात हजेरी लावत आता आपला मोर्चा देवरी तालुक्याच्या दिशेने वळविला आहे. शुक्रवारी (दि. ११) सकाळी  सुद्धा हत्तीच्या कळपाचे लोकेशन चिचगड परिसरात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वनविभागाची चमू चिचगड परिसरात दाखल जंगली हत्तीच्या कळपाने चिचगड,चिमणटोला परिसरात एन्ट्री केली. या परिसरातील धानपिकांचे नुकसान केले. त्यामुळे वनविभागाचे चमू या हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी या परिसरात दाखल झाले आहे. गावकऱ्यांनी मोहाफुले वाळू घालू नये तसेच हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना गावकऱ्यांना केल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणजिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शेतकरी शेतात  असतात. मात्र जंगली हत्तीच्या कळपाने चिचगड, चिमणटोला परिसरात हजेरी लावून धानपिकांची नासधूस करण्यास  सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव