शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागणडोह येथे हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 23:13 IST

हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान,  रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने हल्ला करून झोपड्यांची नासधूस केली. काही झोपड्यांच्या भिंतीदेखील पाडल्या. तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान केले. 

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरातच हत्तींचा मुक्काम असून, बुधवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास केशोरीपासून १२ किमी अंतरावरील नागणडोह येथे हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून झोपड्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात  नुकसान केले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये  भीतीचे  वातावरण  निर्माण झाले होते. येथील ३० ते ३५ नागरिकांना तिडका येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान,  रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने हल्ला करून झोपड्यांची नासधूस केली. काही झोपड्यांच्या भिंतीदेखील पाडल्या. तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान केले. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती या वस्तीतील लोकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचा स्टॉप, आरआरटी पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. वस्तीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून येथील नागरिकांना बोरटोला येथे हलविण्यात आले आहे. हत्तींचे या परिसरात वास्तव्य असेपर्यंत या नागरिकांची बोरटोला येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हत्तींचा नागणडोह परिसरात मुक्काम मागील पंधरा दिवसांपासून हत्तींचा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरातच मुक्काम आहे. बुधवारी या हत्तींच्या  कळपाने उमरपायली परिसरातील धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर या हत्तींनी आपला मोर्चा नागणडोह परिसराकडे वळविला आहे. बोरटोला परिसरात हत्तींच्या कळपाचे वास्तव्य असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

वन विभागाचे पथक डेरेदाखल - नागणडोह येथे हत्तींनी धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आला. यानंतर वनविभागाचे ५० कर्मचाऱ्यांचे पथक नागणडोह येथे दाखल झाले आहे. तसेच आरआरटी पथकसुद्धा या ठिकाणी पोहोचले आहे. येथील वस्तीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव