शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला कारकून एसीबीच्या जाळ्यात; ६ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 16:51 IST

आमगाव येथील तहसील कार्यालयात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देजमिनीवरून नाव कमी करण्याचे प्रकरण आमगाव तहसील कार्यालयातील कारवाई

गोंदिया : जमिनीवरील नाव कमी करून देण्यासाठी लाचेची मागणी करून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आमगाव येथील तहसील कार्यालयात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. छाया वासुदेव रहांगडाले (४३, रा. बनगाव, आमगाव) असे लाचखोर कारकूनचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार यांच्या जमिनीवरून त्यांना बहिणीचे नाव कमी करावयाचे होते व त्यासाठी त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आमगाव येथील तहसील कार्यालयात २ मार्चला अर्ज दिला होता. मात्र, आतापर्यंत त्याबाबत नोटीस आली नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.२२) ते रहांगडाले यांना भेटले व विचारणा केली. रहांगडाले यांनी काम करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर त्यांनी सोमवारी (दि.२५) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.

तक्रारीच्या आधारे पथकाने मंगळवारी (दि.२६) तहसील कार्यालयात सापळा लावला. त्यात रहांगडाले यांनी पंचासमक्ष तक्रारदाराला आठ हजार रुपयांची मागणी केली व तडजोडीअंती सहा हजार रुपये स्वीकारले. या प्रकरणात रहांगडाले यांच्यावर आमगाव पोलिसांत कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण