शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

जलयुक्त शिवारात ९४ गावे

By admin | Updated: February 9, 2015 23:14 IST

सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०१९ पर्यंत

पाणीटंचाईवर होणार मात : गोंदिया, तिरोडा, सालेकसा, गोरेगावातील सर्वाधिक गावांची निवडगोंदिया : सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली आहे.शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणांतर्गत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी आणि पिकांना संरक्षीत सिंचन देण्याची व्यवस्था करुन विकेंद्रीत पाणीसाठे या अभियानातून निर्माण करण्यात येणार आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ४६ गावात ८९ कामे सुरू आहेत. ज्या ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये तिरोडा २४, सालेकसा १३, गोरेगाव १३, गोंदिया २४, देवरी ७, आमगाव ४, सडक अर्जुनी ५ आणि अर्जुनी मोरगाव ४ गावांचा समावेश आहे.या अभियानांतर्गत कृषी विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यात १७ जानेवारीला शेततळे, माता नाली बांध, सिमेंट नाला बांध, भात खाचरे दुरुस्तीची कामे सुरू केली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाने गोंदिया तालुक्यातील बिरसोला, गिरोला, गोरेगाव तालुक्यातील लिंबा आणि बोटे, तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे नळ पाणी पुरवठा योजना, गोंदिया पाटबंधारे विभागाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध व बीडटोला येथील नवेगावबांध लघू प्रकल्पाचे गोंडउमरी वितरिकेवरील निवडक ठिकाणी अस्तरीकरणाचे काम, जि.प.च्या लघू पाटबंधारे विभागाने साठवन बंधारा दुरुस्ती, ल.पा. तलावांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती, नला सरळीकरण, साठवण बंधारे, साठवण तलावांची कामे सुरू केली आहे. विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावशिवारातच अडविणे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासोबतच शेतीसाठी संरक्षीत पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती देणे तसेच ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्जीवीकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तिवात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोत्यांची उदा. बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदिंची पाणीसाठवण क्षमता पुन:र्स्थापीत करणे, त्याचप्रमाणे ती वाढविणे, अस्तित्वात असलेल्ळा जलस्त्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्त्रोत्यांचा पाणीसाठा वाढविणे, वृक्षलागवडीस प्रोत्साहन देवून वृक्ष लागवड करणे, पाण्याच्या टाळेबंदाबाबत जनतेत जाणीव-जागृती निर्माण करणे आदींचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)