शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपाने विक्रीतून मिळणार ९.२३ कोटी

By admin | Updated: July 19, 2015 01:26 IST

गोंदिया वन विभागातील संपूर्ण २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली होती.

दोन वर्षांचे बोनस बाकी : २०१२ व २०१३ मध्ये १४.७७ कोटी बोनस वाटपगोंदिया : गोंदिया वन विभागातील संपूर्ण २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली होती. तेंदूपानांच्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे पार पडले. या हंगामातील तेंदूपानांच्या घटक विक्रीपोटी शासनाला नऊ कोटी २३ लाख ३७ हजार ७८२ रूपयांचा महसूल प्राप्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सन २०१५ च्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर उत्तम नियोजनातून पूर्ण केले. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचे धोरण आहे. सद्यस्थितीत गोंदिया वन विभागातील सन २०१२ हंगामातील मजुरांचे बोनस वितरणाचे काम जवळजवळ संपुष्टात आले आहे. तसेच सन २०१३ हंगामातील बोनस वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर सन २०१४ हंगामातील बोनस वाटपाला सुरूवात होणार आहे. तसेच अवघ्या सहा महिन्यांत बोनस वाटपाचे काम पूर्ण करण्याचा गोंदिया वन विभागाचा निर्धार असल्याचे समजते. सन २०१४ व सन २०१५ या दोन वर्षांचे बोनस वितरण होणे बाकी आहे. तर सन २०१२ हंगामातील ९९.३४ टक्के व सन २०१३ हंगामातील ९४.७२ टक्के मजुरांना बोनस वितरित करण्यात आले आहे. यातील काही मजुरांचा मृत्यू झाला असून तर काही मजुरांची बँकेत खाती नसल्यामुळे त्यांचा बोनस वाटप करणे बाकी असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते. तेंदूपान संकलनाच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होत असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. मात्र यात त्यांच्या जिवीतालाही धोका निर्माण होत असल्याचे प्रकार घडतात. यामुळे मजुरांनी प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) दोन वर्षांत ८७,९८६ मजुरांना बोनस वाटपसन २०१२ व २०१३ मधील ८७ हजार ९८६ मजुरांना १४ कोटी ७७ लाख ४० हजार ९२१ रूपयांचे बोनस वितरित करण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये बोनससाठी पात्र मजूर संख्या ५० हजार १०७ होती. त्यांना १० कोटी ७३ लाख ५३ लाख ४५५ रूपयांचे बोनस द्यावयाचे होते. यापैकी ४९ हजार ९३६ मजुरांना १० कोटी ६६ लाख ४० हजार १११ रूपयांचे बोनस वाटप करण्यात आले असून त्यांची टक्केवारी ९९.३४ आहे. तर सन २०१३ मध्ये बोनससाठी पात्र मजूर संख्या ३९ हजार ०९० होती. त्यांना चार कोटी ३३ लाख ९१ हजार ५६१ रूपयांचे बोनस वाटप करावयाचे होते. यापैकी ३८ हजार ०५० मजुरांना चार कोटी ११ लाख ८१० रूपयांचे बोनस वाटप करण्यात आले असून याची टक्केवारी ९४.७२ एवढी आहे.आठ कोटींची मजुरी वाटपतेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामांसाठी मजुरांना सुमारे आठ कोटी रूपये मजुरी परवानाधारकांमार्फत वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे मजूरांच्या कुटुंबांना उन्हाळ्याच्या दिवसांत या मजुरीच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक आधार प्राप्त झालेला आहे. या वर्षात गोंदिया वन विभागासाठी नेमून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९० टक्के तेंदूपानांचे संकलन झालेले आहे. गोंदिया वन विभागात एकूण ४० हजार ९३६ गोणी तेंदूपाने संकलन झालेली आहेत. तेंदूपाने संकलन कामामुळे मे महिन्यात सुमारे ४.५० लाख मजूर दिवस रोजगार निर्मिती झालेली असून सुमारे ५० हजार मजुरांना उन्हाळ्याच्या कालावधीत रोजगार प्राप्त झालेला आहे.