शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के रोवणी आटोपली

By admin | Updated: August 12, 2016 01:23 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त आहे. मात्र तरीही रोवणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

पुन्हा पावसाची प्रतीक्षा : १ लाख ६० हजार ४६३ हेक्टरवर धान लागवड गोंदिया : गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात जास्त आहे. मात्र तरीही रोवणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ८ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ९० टक्के धानाची रोवणी आटोपली आहे. १ लाख ६० हजार ४६४.४ हेक्टरमध्ये रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एक लाख ७८ हजार २२९ हेक्टर क्षेत्रात धान लागवडीचे उद्दिष्ट होते. यापैकी एक लाख ४९ हजार २२९ हेक्टर क्षेत्रात रोवणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम ८४ टक्के पूर्ण झालेले आहे. याशिवाय १० हजार ९७१.८ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत. ८ आॅगस्टपर्यंत गोंदिया तालुक्यातील ३९ हजार ६११ हेक्टरपैकी २८ हजार ४०२.६ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली. गोरेगाव तालुक्यातील १९ हजार ९३१ हेक्टरपैकी १८ हजार ९५०, सालेकसा तालुक्यातील १६ हजार ८८९ हेक्टरपैकी १३ हजार ३२७, तिरोडा तालुक्यातील २४ हजार २४५ हेक्टरपैकी २२ हजार २७०, आमगाव तालुक्यातील १९ हजार २४८ हेक्टरपैकी १६ हजार ९३८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २२ हजार ५८४ हेक्टरपैकी २० हजार ६७२, सडक-अर्जुनी तालुक्यातील १७ हजार २२५ हेक्टरपैकी १५ हजार ७८८ व देवरी तालुक्यातील १८ हजार ४९६ हेक्टरपैकी १३ हजार १४५ हेक्टरमध्ये रोवणीचे कार्य पूर्ण झालेले आहे. आता रोवणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. थोडेफार कार्य बाकी आहे. ते एका आठवड्याच्या आता पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया तालुक्यात १८७७.६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात ५०३ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९२६ हेक्टर, तिरोडा तालुक्यात २४४ हेक्टर, आमगाव तालुक्यात २८९ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७३५.२ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात ८०२ हेक्टर व देवरी तालुक्यात पाच हजार ५९५ हेक्टरमध्ये आवत्यांचे कार्य पूर्ण करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) इतर पिकांचीही लागवड जिल्ह्यास धानाचे कोठार संबोधिले जाते. जास्तीत जास्त लोक तांदळाचा आहारात उपयोग करतात. परंतु तांदळासह वरण नसेल तर स्वाद मिळत नाही. जिल्ह्याच्या सहा हजार ०४९ हेक्टर क्षेत्रात तुरचे पीक लावण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात सहा हजार ८५०.३ हेक्टरमध्ये तुरीचे पीक लावण्यात आले. हे उद्दिष्टाच्या ११३ टक्के आहे. मुंगाच्या पिकासाठी २१३ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठरविले होते. प्रत्यक्षात केवळ चार हेक्टरमध्येच मुंग लावण्यात आले आहे. मुंग लागवडीचे काम अद्यापही सुरूच आहे. उडीदच्या पिकासाठी १४४ हेक्टरचे उद्दिष्ट आहे. इतर पिके ३३८ हेक्टरमध्ये लावण्यात येत आहेत. यापैकी ६४.५ हेक्टरमध्ये लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. मकर संक्रांतीमध्ये तिळाला खूप महत्त्व असते. गोड पदार्थ व लाडू बनविण्यासाठी तिळाचा उपयोग केला जातो. जिल्ह्यात एक हजार २७६ हेक्टरमध्ये तिळाचे पीक लावण्याचे निर्णय कृषी विभागाने घेतले. प्रत्यक्ष ७७९.१ हेक्टर क्षेत्रात तिळ लावण्यात आले आहे. हे कार्य ६१ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५६८.२ हेक्टरमध्ये भाजीपाला पीक लावण्यात आले आहे. भविष्यात ऊसाच्या शेतीला अधिक महत्त्व असणार आहे. त्यासाठी ९५८ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. परंतु सद्यस्थितीत २२७ हेक्टर क्षेत्रातच ऊसाचे पीक लावण्यात आले आहे.